Election2020: अमरावती पाठोपाठ अकोल्यातही आमदार देशपांडेंवर गुन्हे दाखल

शहरातील ज्युबली इंग्लीश स्कुलमध्ये निवडणूक संदर्भात बैठक घेतली. 




भारतीय अलंकार

अकोला: परवानगी न काढता एका शाळेत सभा घेतल्याने शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यावर रामदासपेठ पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल झाले आहेत.



शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत उभे असलेल्या आ.श्रीकांत देशपांडे यांनी अकोला शहरातील ज्युबली इंग्लीश स्कुलमध्ये निवडणूक संदर्भात बैठक घेतली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या भरारी पथकातील नायब तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयोजक श्रीकांत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता, कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाण असताना सुध्दा प्रचार बैठकीचे आयोजन केल्याने कलम २६९, २७०, १८८ भादंवि आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब तसेच साथरोग अधिनियम १९९७ कलम २,३,४ अन्वये रामदासपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.



अमरावतीत सुध्दा विना परवानगी सभा


अमरावती येथेही जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी न घेता, बैठक आयोजीत केल्याप्रकरणी आ.श्रीकांत देशपांडे यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या भंगासह आचारसंहीतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची आचारसंहीता लागु असल्याने हे गुन्हे दाखल झाले आहेत.


हे सुध्दा वाचा:निवडणुका अश्याही लढविल्या जावू शकतात; भाऊ श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात बहीण संगीता शिंदे यांनी दाखल केली तक्रार


टिप्पण्या