Election2020: अमरावती विभाग: शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक रिंगणात एकूण २८ उमेदवार

       राजकारण:गल्ली ते दिल्ली


शेवटच्या दिवशी २० उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

                                     file image



भारतीय अलंकार

अमरावती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज २० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यामुळे निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या आता २८ एवढी झाली आहे.


शेवटच्या दिवशी यांनी दिले अर्ज

आज प्रा. अरविंद माणिक तट्टे (अपक्ष), राजकुमार श्रीराम बोनकिले (अपक्ष), महेश विष्णू डवरे (अपक्ष), श्रीकांत गोविंद देशपांडे (शिवसेना), सय्यद रिझवान सय्यद फिरोज (अपक्ष), सुनील मोतीराम पवार (अपक्ष), अभिजीत मुरलीधर देशमुख (अपक्ष), चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहन भोयर (अपक्ष), किरण रामराव सरनाईक (अपक्ष), प्रा. अनिल मधुकर काळे (बळीराजा पार्टी), निलेश नारायण गावंडे (अपक्ष), आलम तन्वीर सैय्यद नियाज अली (अपक्ष), शरद कृष्णराव हिंगे (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), दिपंकर सुर्यभान तेलगोटे (अपक्ष), संजय वासुदेव आसोले (अपक्ष), श्रीकृष्ण बापूराव ठाकरे, डॉ. मुश्ताक अहेमद रहेमान शाह (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), मोहंमद शकील अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले.


           

२८ उमेदवार

या निवडणुकीत आतापर्यंत विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), प्रवीण उर्फ पांडुरंग नानाजी विधळे (अपक्ष), सुनील मोतीराम पवार (अपक्ष), संजय वासुदेव आसोले (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (अपक्ष), राजकुमार श्रीरामअप्पा बोनकिले (अपक्ष), प्रकाश बाबाराव काळपांडे (अपक्ष), दिलीप आनंदराव निंभोरकर (लोकभारती), डॉ. नितीन रामदास धांडे (भारतीय जनता पक्ष), चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहनराव भोयर (अपक्ष), सतीश माधवराव काळे (अपक्ष), प्रा. विनोद गुलाबराव मेश्राम (अपक्ष), प्रा. अरविंद माणिकराव तट्टे (अपक्ष), महेश विष्णू डवरे (अपक्ष), श्रीकांत गोविंद देशपांडे (शिवसेना), सय्यद रिझवान सय्यद फिरोज (अपक्ष), अभिजीत मुरलीधर देशमुख (अपक्ष), किरण रामराव सरनाईक (अपक्ष), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), निलेश नारायण गावंडे (अपक्ष), आलम तन्वीर सैय्यद नियाज अली (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), दिपंकर सुर्यभान तेलगोटे (अपक्ष), श्रीकृष्ण बापूराव ठाकरे, डॉ. मुश्ताक अहेमद रहेमान शाह (अपक्ष), मोहंमद शकील अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष) या २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.



मतदान प्रक्रियेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण


अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षकांसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांत १८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी मास्टर ट्रेनरच्या नियुक्तीचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी जारी केला.



विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत म्हस्के व तिवसा-भातकुलीचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांना मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण आयोजित करणे, नियुक्त मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांना प्रशिक्षण देणे, मतमोजणी प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयस्तरावर प्रशिक्षण आयोजित करणे, प्रशिक्षण साहित्य तयार करणे, नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्याशी नियमित समन्वय ठेवून मतदान व मतमोजणी अनुषंगिक साहित्य पुरविणे आदी जबाबदारी मास्टर ट्रेनर यांना देण्यात आली आहे.


                                                      

निवडणूक निरीक्षक आनंद लिमये अमरावतीत दाखल



शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये हे अमरावती येथे दाखल झाले आहेत. 



लिमये हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, ते यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे महासंचालक पदावर कार्यरत  आहेत. अमरावती येथे त्यांचे वास्तव्य व कार्यालय शासकीय विश्रामगृहात पूर्णा कक्ष येथे आहे. संपर्क दूरध्वनी क्रमांक (0721) 2661616 असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून समाजकल्याण विभागाचे उपायुक्त सुनील वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 7796110107 असा आहे.  

    

                                               

स्टार प्रचारकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी 



कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन निवडणुकीच्या प्रचाराकरिता स्टार प्रचारकांसाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. निवडणुका निष्पक्ष, शांततापूर्ण, पारदर्शक, नैतिक आणि सुरक्षितरित्या व्हाव्या हा यामागील मुख्य उद्देश आहे. भविष्यात कोविड-19 काळात होणाऱ्या निवडणुकांत प्रचारासाठी स्टार प्रचारकांना या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावे लागेल, असे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.



या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता मान्यताप्राप्त राष्ट्रीय, राज्यस्तरीय राजकीय पक्षाला स्टार प्रचारकांची संख्या ४० ऐवजी तीस ठेवावी लागेल. तसेच मान्यताप्राप्त असलेल्या नोंदणीकृत राजकीय पक्षांसाठी स्टार प्रचारकांची संख्या कोविड-19 च्या काळात वीस ऐवजी १५ असेल. त्याचप्रमाणे स्टार प्रचारकांची यादी सादर करण्याचा कालावधी अधिसूचना जारी केल्यानंतर सात दिवसांऐवजी दहा दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. ज्या राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी सादर केलेली आहे, त्यांना सुधारित यादी दिलेल्या कालावधीत पुन्हा सादर करावी लागेल. स्टार प्रचारकांच्या सभेसंबंधी परवानगी घेण्यासाठी प्रचाराच्या ४८ तास अगोदर जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे याची माहिती द्यावी लागेल जेणेकरून सर्व सुरक्षा उपाय वेळेच्या आत करणे शक्य होईल. ही सर्व सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तात्काळ प्रभावाने अमलात आली आहेत.


                  


टिप्पण्या