Election2020:शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित; निवडणुकीची अधिसूचना गुरूवारी प्रसिद्ध होणार

या निवडणुकीसाठी मंगळवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.





अमरावती : भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020 कार्यक्रम आज घोषित केला. यानुसार 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

 

या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्र गुरूवार, 12 नोव्हेंबर  रोजीपर्यंत भरता येणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, 17 नोव्हेंबर रोजीपर्यंत मागे घेता येणार आहे.

 

या निवडणुकीसाठी मंगळवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सोमवार,  7 डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे. या निवडणुकीबाबत आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. या आदर्श आचारसंहितेचे पालन संबंधितांनी करावे, असे आवाहन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले आहे.



नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी आचारसंहिता लागू


भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूर विभाग मतदारसंघासाठी 1 डिसेंबर  रोजी मतदान घेण्यात येत असल्यामुळे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.

 

महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, दिनांक 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

टिप्पण्या