Election 2020: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ: अकोला जिल्ह्यात 6480 मतदार बजावणार आपला हक्क; 12 मतदान केंद्रांवर सज्जता

Amravati Division Teachers Constituency Election 2020: 6480 voters to exercise their right in Akola district;  Readiness at 12 polling stations



भारतीय अलंकार

अकोला:  अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मंगळवार 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणेने सज्जता केली आहे. जिल्ह्यात 12 मतदान केंद्र सज्ज असून 6480 शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.



मतदान केंद्र सज्ज



यासंदर्भात जिल्हा निवडणूक शाखेतून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात 4305 पुरुष तर 2175 महिला असे एकूण 6480 शिक्षक मतदार आहेत. या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  12 मतदान केंद्रांवर सज्जता करण्यात आली आहे.  



हे आहेत मतदान केंद्र



जिल्ह्यात  तहसिल कार्यालय, अकोट, संजय गांधी योजना विभाग, गाडेगाव रोड, तहसिल कार्यालयाची जुनी इमारत, तेल्हारा, पंचायत समिती सभागृह, बाळापूर, जि.प. आगरकर कनिष्ठ महाविद्यालय, खोली क्रमांक एक, दोन व खोली क्रमांक तीन अकोला, राधादेवी गोएंका महिला महाविद्यालय, खोली क्रमांक एक, दोन व तीन मुर्तिजापुर रोड, अकोला, संजय गांधी योजना विभाग तहसिल कार्यालय पातूर,  पंचायत समिती सभागृह, बार्शी टाकळी,  संजय गांधी योजना विभाग तहसिल कार्यालय मुर्तिजापुर अशी बारा मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच निवडणूक कर्मचारी नियुक्त आहेत. 



कर्मचारी तैनात


राखीव कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन एकूण 63 कर्मचारी व 15 सुक्ष्म निरीक्षक तैनात आहेत. या शिवाय  कोविड च्या अनुषंगाने प्रत्येक मतदान केंद्रावर तीन आरोग्य कर्मचारी व सुरक्षा व्यवस्थेसाठी अन्य कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत,अशी माहिती  उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली. दरम्यान आज सकाळ पासून मतदान कर्मचारी आपल्या मतदान साहित्यासह आपापल्या केंद्रांकडे रवाना झाले.  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वितरण केले.


टिप्पण्या