Education: महेश इन्नानी यांना आचार्य पदवी

संस्कृत भाषेतील १६ संस्कारांचे मानवी जिवनातील महत्व 


अकोला:  येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील  राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम  येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत डॉ.महेश सुभाषचंद्र इंन्नानी यांना संस्कृत भाषेतील १६ संस्कारांचे मानवी जिवनातील महत्व या विषयामध्ये आचार्य पदवी ( पीएचडी ) प्राप्त झाली आहे.


त्यांना संत श्री गाडगेबाबा विद्यापिठ अमरावती यांचे व्दारे आचार्य ही पदवी देण्यात आली आहे. डॉ.महेश यांनी कोवीड काळात देखील डॉ.पं.दे.कृ. सेंटर व रेल्वे स्थानकावर विशेष सेवा दिली आहे. 



यशाचे श्रेय ते डॉ.राजकुमार चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक, आई -वडील, बहिण, व मार्गदर्शक डॉ.ज्योती नाईक यांना देतात. त्यांनी लिहलेला हा प्रबंध समाजात संस्कारांचे महत्व पटवुन देणारा आहे. आजच्या पिढीला भारतीय संस्कृतीचे महत्व सांगणारा आहे .

टिप्पण्या