Diwali2020: शिवाजी महाविद्यालयाने आदिवासी गावात साजरी केली सामाजिक दिवाळी

साथ सेवक फाउंडेशनचे सहकार्य 



भारतीय अलंकार

अकोला: श्री शिवाजी महाविद्यालय हे डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांनी प्रेरित असून, या महाविद्यालयाचे सातत्याने सामाजिक उपक्रम सुरू असतात. यावर्षी कोरोना आजारामुळे सर्व सामाजिक व आर्थिक स्थिती विस्कळीत झाली आहे. यात  सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव आर्थिक दृष्ट्या अधिक खचले. यामुळे यावर्षी श्री शिवाजी कॉलेजने सामाजिक दिवाळी आदिवासी चिखलदरा तालुक्यातील खिरपाणी गावात साजरी केली.




तिथे जाऊन परिस्थिती जाणून घेतली आणि खिरपाणी गावातील सर्व गावकऱ्यांना दिवाळीची भेट दिली. ज्यामध्ये लहान मुलांना कपडे, स्त्रियांना साडी, लुगडे, ड्रेस तसेच पुरुष व गावातील तरुणांना शर्ट-पॅन्ट, वृद्धांना धोतर आणि दिवाळीचे फराळ सस्नेह दिवाळी भेट देण्यात आली. परंतु ही वेळ कोरोना प्रादुर्भावाची असल्यामुळे "क" जीवनसत्त्वच्या गोळ्या गावकऱ्यांच्या आरोग्य हितासाठी त्यांना देण्यात आल्या. 



यामध्ये महाविद्यालयातील ह्युमॅनिटी, वाणिज्य, विज्ञान व गृहविज्ञान IQAC, समाजशास्त्र विभाग, राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय सेवा योजना, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र , तसेच  सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि "साथ सेवक फाउंडेशन अकोला या सर्वांनी मिळून सामाजिक दिवाळीचे यशस्वी आयोजन केले.  



यासाठी इतरांच्या आनंदात समाविष्ट होण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात समोर आले होते. त्यांचे साथ सेवक फाउंडेशनने आभार व्यक्त केले. कोरोना संदर्भात व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. 

कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, प्रा.डॉ.विवेक हिवरे, प्रा. महल्ले (अंजनगाव सुर्जी), प्रा. डॉ.आनंदा काळे, प्रा.डॉ.गणेश खेकाडे , प्रा.डॉ.प्रकाश आढे, प्रा.डॉ.समिधा कडू, प्रा.प्राजक्ता पोहरे, विलीन धोत्रे, तसेच साथ सेवक विकास जाधव, यश तिवारी, सागर वारके,  सौरव वाघोडे, यश बनाईतकर, किशोर गावंडे, शुभम पौळ, दिनेश सरप, शुभम राहणे, शुभम पगृत, अंकित चितोडे, संकेत भालेराव, अभिनव वाघाडे, मंगेश चांदूरकर, रोहन बुंदेले, अखिलेश अनासाने, ज्ञानेंद्र पार्वते, ऋषिकेश इंगळे, शुभम जामोदे, हर्षल पाटील, प्रवीण मालोकार, वैष्णवी आढे, कोमल पारडे, नयनतारा रायबोले, पूनम गावंडे, राधा धुमाळे, प्रतिक्षा प्रधान, माधुरी इंगळे यांनी सहकार्य केले. त्याबद्दल अंकुश इंगळे, अक्षय राऊत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.



"आजही आदिवासी भागांमध्ये लोकांचे राहणीमान, जीवनमान व शैक्षणिक स्तर खालावलेला आहे. या समाजाची वास्तविकता शहरातील विद्यार्थ्यांना समजावी व त्यांच्या समस्या कशा सोडवता येतील, याविषयी चिंतन करता आले पाहिजे. आदिवासी बांधवांमध्ये आनंद निर्माण करता आला पाहिजे. यासाठी हा महाविद्यालयाचा सामाजिक उपक्रम होता असे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे.


                   प्राचार्य. डॉ. रामेश्वर भिसे 

               श्री शिवाजी कॉलेज,अकोला.




"आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून वेगळाच आनंद झाला. सोबतच सामाजिक दायित्वाची जाण करून देणारा हा उपक्रम ठरला. या गावांमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचली तर निसर्गाच्या कुशीत असणाऱ्यांची शैक्षणिक उंची वाढावी ही ईच्छा आहे."


                                 अक्षय राऊत 

                            संस्थापक अध्यक्ष, 

                       साथ सेवक फाउंडेशन




"सामाजिक दिवाळी आयोजनाच्या मागचा उद्देश हाच की, एकीकडे कोरोनाचे महासंकट या विपरीत परिस्थितीत लोकांना होणार मानसिक त्रास आणि यामध्येच भरकटतच चाललेली तरुणाई यांची सांगड घालून युवकांमध्ये समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेने एक साथ की जी पैश्याने नाहीतर साथ देवून, सोबत राहून दिवाळी साजरी करण्याचा हा आमचा मानस."


                              अंकुश  इंगळे 

               सचिव,साथ सेवक फाउंडेशन



टिप्पण्या