- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ऐन थंडीच्या दिवसात उघड्यावर राहणाऱी ही कुटुंब त्यांच्या दिवाळीच काय?
भारतीय अलंकार
अकोला: भारतीय संस्कृतीत सर्वात मोठा सण दिवाळी. हा सण आला की, आनंदाला पारावर राहत नाही. घराची रंग रंगोटी, गृह सजावट, नवनवीन वस्तूंची खरेदी, कपडे , फराळ ,मिठाई , फटाके सगळीकडे आनंदी आनंद. पण जे उपेक्षित, निराधार, ज्यांच्या हाताला काम नाही अशांच्या दिवाळीच काय ? अकोला शेगाव रेल्वे मार्गांवर पारस जवळ रेल्वे रुळाच्या कडेला आणि कंचनपूर गावी पोटाची खळगी भरण्यासाठी
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील अंतरवेली , देदला, कोया धारिया , मेघ नगर व वावडी या गावातून सुमारे ५० गरीब कुटुंब आपलं घरदार, नातेवाईक सर्व सोडून पत्नी व लहान मुलांसह आलेली आहेत . रेल्वे मार्गांवर गिट्टी पसरविणे व शेतमजुरी व मिळेल ते काम स्वीकारण्याची त्यांची मानसिकता आहे. ऐन थंडीच्या दिवसात उघड्यावर राहणाऱी ही कुटुंब त्यांच्या दिवाळीच काय? नेमकी ही बाब कस्तुरी या सामाजिक संस्थेच्याच्या संवेदनशील मनानं हेरली. आणि या परप्रांतीय कामगारांच्या जीवनात घेऊन आली " दिवाळी.. आनंदाची... "
बुधवार ११ नोव्हेंबर रोजी पारस व गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी कंचनपूर येथे धत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला कस्तुरीने या वंचित कामगारांची दिवाळी साजरी करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. आणि अतिथी देवो भव... ही संस्कृती प्रत्यक्षात खरी करून दाखविली.
या निमित्ताने प्रत्येक कुटुंबासाठी शेव, चिवडा, शंकरपाळे, बेसन वडी, सोनपापडी लहान मुलांसाठी नवीन कपडे व चॉकलेट, भगिनींना भाऊबीजेची साडी, कुटुंबातील प्रमुख व्यक्तीस वुलन शालचे वितरण करण्यात आले.कस्तुरीची हीच खरी दिवाळी. श्रमिकांची. आनंदाची.
या प्रसंगी सर्व कामगार, मुले, भगिनी यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी माजी आमदार वसंतराव खोटरे, डॉ. शांताराम बुटे, प्रा. किशोर बुटोले,यशवंत देशपांडे , प्रा. विद्या राऊत, संजय ठाकरे , राजेश्वर पेठकर, शारदा शर्मा, अमर शर्मा , जगन्नाथ बरडे, विजय घाटे, गोविदसिंह गहीलोत, अनिल पालवे, संजय गायकवाड, दामोदर नुपे ,जयंत अपतुरकर, अनिल मुलचंदानी, जयंत जोशी, विष्णू चोरे, विपुल बुटोले, किशोर बांधवकर, राहुल शेरीकर, दीपक वाघमारे, पंडित पळसपगार , पद्माकर मोरे, मीरा देशपांडे, माया बुटोले , संगीता जोध, मेघा कनकेकर,चेतना आनंदानी, उज्वला बाजपेयी, शारदा नेमाडे, कीर्ती गहीलोत परिश्रम घेत आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा