Crime news: अकोला येथील नकली नोटांचे धागेदोरे शेगावात ;एका पत्रकारासह चौघे ताब्यात

तपासा दरम्यान या प्रकरणाची पाळेमुळे  शेगावात असल्याची माहिती समोर आली

                     photo:अकोला स्थागुशा




भारतीय अलंकार

अकोला: ५०० रूपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अकोला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सहा दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. तपासा दरम्यान या प्रकरणाची पाळेमुळे संत नगरी शेगावात असल्याची माहिती समोर आली. यामुळे आज अकोला पोलिसांनी शेगाव येधील ४ घरांची झडती घेतली. या झडतीमध्ये अकोला पोलीसांनी शेगाव येथील पत्रकार जावेद शाह याच्यासह चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली. झडती मध्ये नकली नोटा मिळून आल्या अथवा नाही,याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.



काय आहे प्रकरण


११ नोव्हेंबर रोजी अकोला स्थानिक गुन्हे शाखेस गोपनिय सूत्राकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, एक इसम हा अकोट फैल परीसरातील मच्छी मार्केट मध्ये बनावट चलनी नोटा चालविण्याचा प्रयत्न करीत आहे. यावरुन स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक  शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक सागर हटवार यांचे तपास पथकाने अकोट फैल परीसरातील मच्छी मार्केट मध्ये सापळा रचुन आरोपी अबरार खान हयात खान (वय २७ वर्ष रा. नायगांव, अकोट फैल) यास ५००/- रु छापील किंमतीच्या बनावट चलनी नोटा बाळगुन त्या परिसरातील दुकानात चालविण्याचा प्रयत्न करीत असतांना ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीमधुन ५००/- रु छापील किंमतीच्या एकच क्रमांक नमुद असलेल्या ०३ बनावट चलनी नोटा एकुण दर्शनी किंमत १५००/- रु च्या जप्त करण्यात आल्या. तसेच त्याचे नायगांव, अकोट फैल येथील राहते घराची घरझडती घेवुन ५००/- रु छापील किंमतीच्या ५४ बनावट चलनी नोटा एकुण दर्शनी किंमत २७,०००/- रु च्या जप्त करण्यात आल्या होत्या. 



आरोपी अबरार खान हयात खान यास प्राथमिक विचारपुस केली असता, त्याने या नोटा त्याचे जानोरी, शेगांव, जि. बुलडाणा येथील साळा शेख राजिक शेख चांद याचे जवळुन आणल्याचे सांगितले. यावरुन ग्राम जानोरी, (ता. शेगांव, जि. बुलडाणा) येथे जावुन शेख राजिक शेख चांद यास ताब्यात घेवुन त्याचे घरझडती मधुन ५००/- रु छापील किंमतीच्या एकच क्रमांक नमुद असलेल्या २२ बनावट चलनी नोटा एकुण दर्शनी किंमत ११,०००/- र च्या जप्त करण्यात आल्या आहेत. शेख राजिक शेख चांद, रा. जानोरी, ता. शेगांव, जि. बुलडाणा यास प्राथमिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, त्याने शेगांव येथील राहणा-या एका इसमाकडुन २५,०००/- रु चलनी नोटा देवुन ५००/- रु छापील किंमतीच्या ७९ बनावट चलनी नोटा एकुण दर्शनी किंमत ३९,५००/- रु च्या घेतल्या होत्या. याप्रमाणे आरोपी अबरार खान हयात खान आणि शेख राजिक शेख चांद या दोघांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ५००/- रु छापील किंमतीच्या ७९ बनावट चलनी नोटा एकुण दर्शनी किंमत ३९,५००/- रु च्या पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या. दोन्ही आरोपी तथा जप्त बनावट चलनी नोटा पुढील तपासकामी  अकोट फैल पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले होते.



ही कार्यवाही  पोलीस अधिक्षक  जी. श्रीधर,  अपर पोलीस अधीक्षक  मोनिका राउत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शैलेश सपकाळ, उपनिरिक्षक. सागर हटवार, राजपालसिंह ठाकुर,  सदाशिव सुळकर, गणेश पांडे, रवि इच्छे, अब्दुल माजिद, इजाज अहेमद, मो. रफी, गोपाल पाटील, चालक अविनाश मावळे यांनी केली.



टिप्पण्या