Corona news: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.३१ टक्क्यांवर

राज्यात आज १०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे.


मुंबई, दि. २ : आज १०,२२५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,२४,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.३१ % एवढे झाले आहे.


आज राज्यात ४,००९ नवीन रुग्णांचे निदान.

राज्यात आज १०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,६५,१६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,८७,७८४ (१८.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.



सध्या राज्यात २५,३३,७८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,१९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.






अकोला: 74 अहवाल प्राप्त; नऊ पॉझिटीव्ह, 36 डिस्चार्ज


आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 74 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 65 अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले.


त्याच प्रमाणे काल (दि.31) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8428(6797+1454+177) झाली आहे. आज दिवसभरात 36 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 43331  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  42183 फेरतपासणीचे 227 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 921 नमुने होते. आजपर्यंत एकूण 43161 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 36364 तर पॉझिटीव्ह अहवाल 8428(6797+1454+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आज नऊ पॉझिटिव्ह


दरम्यान आज दिवसभरात नऊ जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  छोटी उमरी येथील दोन जण, तर उर्वरित गोपालखेड, शास्त्री नगर, डाबकी रोड, लक्ष्मी नगर, अकोट फैल, जठार पेठ व  तापडिया नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये तीन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 


36 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून चार जण, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनीक येथून एक जण, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून एक जण तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा 20 जणांना, अशा एकूण 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.



185 रुग्णांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8428(6797+1454+177) आहे. त्यातील 281 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 79 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 185 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.



रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 94 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 94 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.



आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, बार्शीटाकळी, पातूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही, अकोट येथे 16 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे दोन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला,  तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 32 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, 26 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 



वैद्यकीय महाविद्यालय येथे 10 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे पाच चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 94 चाचण्यांमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 21751 चाचण्या झाल्या त्यात 1509 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.



टिप्पण्या