BJP: लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ केले नाही तर,यापेक्षा तीव्र जन आंदोलन होणार-भाजप

मागण्या रास्त पण आंदोलनात कोरोना नियमांचे उल्लंघन




भारतीय अलंकार

अकोला: लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी राज्यभर वीज वितरण कंपनी कार्यालय समोर वाढीव विजबिलाची होळी करून निषेध करण्यात आला. तसेच आगामी काळात जनतेचे वाढीव वीजबिल महाविकास आघाडी सरकारने माफ नाही केले तर या पेक्षा मोठे जनआंदोलन सरकारच्या विरोधात  करण्यात येईल,असे भाजपाने म्हंटले आहे.


या आहेत प्रमुख मागण्या 

 

* लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा 


*कृषिपंपाना सलग आठ तास वीज पुरवठा द्या 


* कृषी व गावठाणचे नादुरुस्त ट्रान्सफार्मर तीन दिवसांत दुरुस्ती करून घ्या .


*ऑइल नसल्याचे कारण सांगून नादुरुस्त ट्रान्सफार्मर देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यासाठी ऑईलचा मुबलक प्रमाणात पुरवठा करा . 


* लॉक डाऊन काळ असतांना कृषी पंपांचे ट्रान्सफार्मर देण्यासाठी प्रति शेतकरी तीन हजार रुपयांची खाजगी एजंटाकडून सुरू असलेली सक्तीची वसुली बंद करा.

                                                        


कोरोना नियमांचे उल्लंघन


राज्यात भाजपच्या वतीने वाढीव विजबिला संदर्भात आंदोलन करण्यात आले हे आंदोलन सोमवारी प्रत्येक विभागात करण्यात आले होते. त्यामुळे या आंदोलनात स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रमुख ठिकाणी आंदोलन ही खासदार आणि आमदारांच्या नेतृत्वात झाली.  आंदोलनामध्ये लोकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी  झाली होती. 



राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सवांद साधताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविषयी माहिती देत जनतेला सतर्कतेचा ईशारा दिला. जनतेला कोरोना पासून सावध राहण्याचा सल्ला दिला. आणि हात धुणे,मास्क घालणे आणि विनाकारण गर्दीत जाऊ नये, हा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.परंतू भाजपच्या वतीने  करण्यात आलेल्या आंदोलननात कोणत्याच नियमांचे पालनझालेले दिसून  आले नाही. 



विजबिल कमी करण्याची मागणी ही रास्त  आहे. मात्र, कोरोनाच्या दुसरी लाट ही परदेशात आली आहे. त्यावर भारताला आणि महाराष्ट्राला सतर्क राहून, लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. परंतु, भाजपा लोकांच्या जीवाशी खेळत आहे का,असा  प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.



अकोल्यात १७ हजार कार्यकर्ते रस्त्यावर



ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची लूट  करू पाहत आहे. सरकारच्या पठाणी कारभाराची भाजपाने होळी पेटवली आहे. अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा नाहीच उलट सावकार सारखी वसुली कसली करत आहे सरकार चालवता की खाजगी सावकारी ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केला. 


सोमवारी अकोला जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने 83 ठिकाणी 13 लाख वीज ग्राहकांच्या वतीने 17 हजार 425 कार्यकर्ते रस्त्यावर येऊन, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या सावकारी निर्णयाचा व व  सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त  केला. 



वीज बिलाची होळी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. भाजपाच्या आंदोलनाला जनतेनी पाठिंबा दिल्याबद्दल जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार सावरकर यांनी आभार व अभिनंदन व्यक्त केले. 



भाजपाचे हे आंदोलन जनतेचा उद्रेक व  असंतोषाचा प्रतीक असून, सरकारने जर याकडे लक्ष दिले नाही तर ठाकरे सरकारला जनभावनाची कदर नसून केवळ भ्रष्टाचार वसुली व गप्पांचा बाजार करणारा सरकार असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी याप्रसंगी केला.


भाजपा प्रदेश कार्यकारिणी  सदस्य तेजराव थोरात यांनी कापशी येथून शेतकऱ्यांच्या  घेऊन जन आंदोलन केले.


महानगराध्यक्ष विजय अग्रवाल नेतृत्वात वीज वितरण कंपनी गौरक्षण रोड येथे आंदोलन करण्यात आले. जयप्रकाश नारायण रेल्वे स्टेशन चौक, जयहिंद चौक या भागात वीज बिलाची होळी दहन करण्यात आले. 





टिप्पण्या