BJP-NCP: भाजपने जनतेची काळजी करू नये-अमोल मिटकरी

साधूसंत म्हणजे नेमके कोण?, आंदोलक स्वतःला साधूसंत म्हणवून घेत आहेत. मग साधूसंतांची  व्याख्या काय आहे?”, असा  प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थितीत केला.


अकोला: भाजपने जनतेची काळजी करू नये. जनतेची काळजी करण्यास महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला.



तुळजा भवानी मंदिर समोर भाजप प्रणित आध्यात्मिक आघाडीच्या वतीने कालपासून मंदीर उघडण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले होते.या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र, पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढून, मध्यरात्री बारा वाजल्या पासून जमाव बंदीचा आदेश लागू केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंदोलक तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. याचे प्रतिउत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वारकरी समाजात फूट पडण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा भाजपला दिला.




कोरोना महामारीच्या जागतिक संकटातून बाहेर येताना राज्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र तरी देखील शाळा, मंदिर अजून बंदच आहेत. यात मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन छेडले आहे.  तुषार भोसले यांनी यासाठीच तुळजापुरात आंदोलन केले.





दिवाळी नंतर शाळा,मंदिरेही टप्याटप्याने सुरू होतील.वारकऱ्यांना मंदिरे उघडण्याची घाई नाही.वारकरी धर्माला धरून काम करतात. मंदिरा बाहेरूनही भक्ती करतात. भक्ती करण्यासाठी मंदिरे उघडी असलीच पाहिजे, असे वारकरी म्हणत नाहीत,असे देखील मिटकरी यांनी म्हंटले.


                 ट्विटर:ट्विट






"हल्ली काही सोंगाडे स्वतः ला साधु संत समजुन वारकरी धर्माला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करताहेत. वाणीतुन अहंकार, जातीद्वेष क्षणोक्षणी झळकणाऱ्या अशा सोंगाड्यांची वाचा बंद करण्यासाठी तुकोबा सांगतात, 

अवघे कोलियाचे वर्म अंडी l 

घातलिया तोंडी खिळ पडे ll "

अमोल मिटकरी, आमदार , राष्ट्रवादी





टिप्पण्या