Bharti singh drugs case: कॉमेडियन भारती व हर्षचा जामीन अर्ज मंजूर

भारती सिंहला शनिवारी सायंकाळी NCB ने अटक केली होती.

                                  f i l e p h o t o




भारतीय अलंकार

मुंबई: कॉमिडियन भारती सिंह (३६) व तिचा पती हर्ष लिंबाचिया (३३) या दोघांनाही जामीन मिळावा, यासाठी काल अर्ज केला होता. त्यावर आज सोमवार सुनावणी होवून विशेष NDPS (मुंबई) न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. 



मुंबई येथे काल भारती आणि हर्षला न्यायालयात हजर केले असता, दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती. भारतीची कल्याण आणि हर्षची तलोजा कारागृहात रवानगी केली होती. 


 

भारती सिंहला शनिवारी सायंकाळी NCB ने अटक केली होती. तिचा पती हर्ष लिंबाचीया याला चौकशी कामी ताब्यात घेतले होते.त्याची जवळपास १७ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली होती.  

 



दरम्यान, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचीया या दोघांना NCB (Narcotics Control Bureau) ने समन्स बजावले होते. यानंतर  शनिवारी भारतीच्या घरी आणि ऑफिस मध्ये धाड टाकून झडती घेतली. भारतीच्या घरी संशयित वस्तू सापडल्या नंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर संध्याकाळी भारतीला NCB ने अटक केली होती. तर हर्षची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. भारतीच्या प्रॉडक्शन ऑफिस आणि घरातून ८६.५ ग्रॅम गांजा सापडला होता. तसेच  गांजा घेत असल्याचे भारती आणि हर्षने NCB अधिकाऱ्यांसमोर कबूल केले होते. 









टिप्पण्या