Bharti singh drugs case: कॉमेडियन भारती व हर्षला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जमानत अर्जावर उद्या सोमवारी होणार सुनावणी





भारतीय अलंकार

मुंबई: कॉमिडियन भारती सिंह (३६) व तिचा पती हर्ष लिंबाचिया (३३) या दोघांनाही आज मुंबई येथे न्यायालयात हजर केले असता, दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. भारतीची कल्याण आणि हर्षची तलोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. 


तसेच आज भारती आणि हर्षने जमानत साठी अर्ज दाखल केला असून, त्यावर उद्या सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या दोघांसोबत आणखी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.



भारती सिंहला काल शनिवारी सायंकाळी NCB ने अटक केली होती. तिचा पती हर्ष लिंबाचीया याला चौकशी कामी ताब्यात घेतले होते.त्याची जवळपास १७ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. आज रविवारी दोघांनाही प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी किल्ला न्यायालय मुंबई येथे हजर करण्यात आले. दोघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या दोघांकडून आणखी काही नवे धागे NCB च्या हाती लागतात का,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 



दरम्यान, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचीया या दोघांना NCB (Narcotics Control Bureau) ने समन्स बजावले होते. यानंतर काल शनिवारी भारतीच्या घरी आणि ऑफिस मध्ये धाड टाकून झडती घेतली. भारतीच्या घरी संशयित वस्तू सापडल्या नंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. चौकशीनंतर संध्याकाळी भारतीला NCB ने अटक केली होती. हर्षची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. भारतीच्या प्रॉडक्शन ऑफिस आणि घरातून ८६.५ ग्रॅम गांजा सापडला होता. तसेच  गांजा घेत असल्याचे भारती आणि हर्षने NCB अधिकाऱ्यांसमोर कबूल केले.


भारती आणि हर्ष असे अडकले जाळ्यात


एनसीबीने खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे १५ बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि ४० ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स सापडले. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले होते. 



करिअरची सुरवात


भारतीने आपल्या करिअरची सुरवात दि ग्रेट इंडियन लाफटर चॅलेंज या स्टँड अप कॉमेडी शो पासून करून, लोकप्रियता प्राप्त केली होती. आज 'दि कपिल शर्मा शो' आणि 'इंडियाज बेस्ट डान्सर' या लोकप्रिय कार्यक्रमाचा ती एक भाग आहे. तर 'इंडियाज बेस्ट डान्सर' कार्यक्रमाचे भारती आणि हर्ष दोघेही सूत्रसंचालन करतात.


टिप्पण्या