Aranab Goswami: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी पोलिसांच्या ताब्यात;सुटका होईपर्यंत भाजपा काळ्या फिती लावणार

रिपब्लिक टीव्हीचा संपादक असलेला अर्णब गोस्वामी याला आज  रायगड पोलिसांनी त्याच्या मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलेले आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई केली आहे.  

                                  (फोटो: ट्विटर)


मुंबई: पुरोगामी महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत पत्रकार अर्णव गोस्वामी अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या दडपशाही विरोधात अर्णव गोस्वामी यांची सुटका होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते काळ्या फिती लावून काम करतील,अशी माहिती भाजपा महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी दिली आहे. दरम्यान, आज देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तरप्रदेश येथे अर्णब गोस्वामीच्या अटकेचा जोरदार निषेध करण्यात आला. 



काय आहे प्रकरण

मुंबईतील ५२ वर्षीय इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग मधील कावीर येथे आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला होता. अर्णब आणि त्याच्या दोन साथीदारांनी नाईक यांचे पैसे थकविले होते.  पैसे मिळत नसल्याने नाईक यांना नैराश्य आले होते. तर या प्रकरणी आणखी धक्कादायक म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता.



मुळचे कावीर येथे राहणारे अन्‍वय नाईक   मुंबईत व्‍यवसाय निमित्‍त राहत होते. अन्वय मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने आंतरिक वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय करायचे. आत्महत्येच्या आदल्या दिवशीच शुक्रवार ४ मे रोजी अन्वय कावीर येथील आपल्या घरी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तसेच त्यांच्या आईचा मृतदेह सुध्दा तिथेच आढळला. पोलिसांना घटनास्थळी आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी याच्यासह आयकास्ट  स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी म्हटले होते.



या घटने नंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून व आत्महत्या पूर्वी लिहण्यात आलेल्या चिट्ठी वरून अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन यांच्या विरुद्ध कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी ही माहिती प्रसार माध्यमाना होती.



*अन्वय नाईक यांनी लिहीलेली सुसाईड नोट त्यांची मुलगी आद्या नाईक हिने माध्यमांना दिली आहे ,ज्यामध्ये अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख आहे. 



*अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर भाजपा आक्रमक झाली असून राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील अर्णब गोस्वामी यांच्या अटके वरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 



*महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं, सरकार सुडाने काम करत नाही, मुंबई, महाराष्ट्र पोलीस सूडबुद्धीने काम करत नाहीत, पोलिसांकडे पुरावे असतील म्हणून कारवाई, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमाना प्रतिक्रिया दिली.








टिप्पण्या