- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वॉरटँकमुळे अकोला व वाशिम जिल्हयाच्या सौंदर्यीकरणामध्ये अधिकाधिक भर पडेल
भारतीय अलंकार
अकोला: रेल्वे स्थानकावर एकशे वीस फुटाचा राष्ट्रीय ध्वज उभारणी, विद्युत रोषणाई व शकुंतला इंजिन लावल्यानंतर आता अकोला मनपा, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, अकोट, मालेगाव आणि रिसोड या भागात सैनिकांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी नामदार संजय धोत्रे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे पाठपुरावा करून आठ रणगाडे (डमी वॉर टँक) उपलब्ध करून घेतले आहे. लवकरच बाकी क्षेत्रासाठी सुध्दा नामदार संजय धोत्रे प्रयत्नशील असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे.
शिक्षण,दुरसंचार व माहीती तंत्रज्ञान केंद्रिय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्याने केन्द्रीय संरक्षण मंत्री, संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडुन अकोला जिल्हयात अकोला महानगरपालिका, अकोला, नगर परिषद, अकोट, मुर्तिजापुर, नगर पंचायत बार्शिटाकळी व वाशिम जिल्हयामध्ये नगर परिषद, रिसोड आणि मालेगाव नगर पंचायत याठिकाणी प्रत्येकी एक या प्रमाणे डमी वॉरटँक (रणगाडा) मंजुर करण्यात आलेले आहे. हे डमी वॉरटँक (रणगाडा) महानगरपालिका व नगर परिषद व नगर पंचायत यांचे अधिनस्त असलेल्या जागेमध्ये लावण्यात येणार आहे.
लावण्यात येणा-या वॉरटँकमुळे अकोला व वाशिम जिल्हयाच्या सौंदर्यीकरणामध्ये अधिकाधिक भर पडेल. तसेच शालेय विदयार्थ्यांना याचा बराच फायदा होणार आहे. यामुळे त्यांच्या शैक्षणिक व बौध्दिक ज्ञानामध्ये निश्चितच भर पडेल. वॉरटँक लवकरच अकोला व वाशिम जिल्हयामध्ये येणार आहे. वारटँक साठी केन्द्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व केन्द्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक (संरक्षण) यांचे सहकार्य लाभले .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा