- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आरोपी कडून अंदाजे एक लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत
भारतीय अलंकार
अकोला: शहरात मागील काही दिवसात घरफोडीच्या घटना वारंवार घडत आहे. भरदिवसा चोरी झाल्याच्या घटना उघड़कीस आल्या आहेत. या घटनांमधील एका आरोपीस शनिवारी खदान पोलिसांनी अटक केली. आरोपीने चार घरफोड्या केल्याची कबुली दिली चौकशी दरम्यान पोलिसांना दिली. आरोपीकडून १ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
घरफोडीतील आरोपींच्या शोधात असतानाच खदान परिसरात एका संशयीताची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहिती वरुन खदान पोलिसांनी शनिवारी सतवीरसिंह बलवंतसिंह टांक (१९) या आरोपीस अटक केली.
मुद्देमाल जप्त
चौकशी दरम्यान आरोपीने चार ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. यामध्ये गोरक्षण रोड, आझाद कॉलनी. श्रद्धानगर, मलकापूर या भागांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीकडून १७ ग्रॅम सोने, २५ ग्रॅम चांदी, एक मोबाइल असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव, दिगंबर अरखराव, रवी डाबेराव, खुशाल नेमाडे, राजेंद्र तेलगोटे, शैलेश जाधव आदींनी केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा