- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महापालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुद्दत संप तूर्तास मागे. सत्ताधारी भाजप आणि आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाल्याने संप स्थगित केला.उद्यापासून महापालिकाद्वारे वसूल करण्यात येणाऱ्या कर वसुलीतून कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन निधी वाटप होणार.
भारतीय अलंकार
अकोला: विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून अकोला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुद्दत संप पुकारला होता. मात्र, संप आता तूर्तास मागे घेण्यात आला. सत्ताधारी भाजप आणि महापालिका आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेण्यात आला.
कोविड संकटामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले कर्तव्य बजावले. मात्र,१४ वर्षापासून कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळालेली नाही. तसेच दोन महिने झाले कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. या व इतर विविध मागण्या प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्या निकाली न निघाल्याने आजपासून कर्मचार्यांनी बेमुदत कामबंद संप पुकारला होता. या संपमध्ये सफाई कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
सत्ताधारी भाजप आणि आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाल्याने आजच हा संप तूर्तास मागे घेण्यात आला आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची वीस हजार रुपये रक्कम येत्या सोमवार पासून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची कबुली यावेळी देण्यात आली आहे.
उद्यापासून नागरिकां कडून वसुल केल्या जाणाऱ्या कर मधून कर्मचाऱ्यांची पगार आणि पेंशन देण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी आयुक्त संजय कापडणीस यांनी दिली.तसेच सर्व मागण्या मंजूर करण्यास मनपा प्रशासन सकारात्मक आहे,असे कामगार आणि प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेत आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे हा संप तूर्तास मागे घेण्यात येत असल्याचे मनपा संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी.भातकुले यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा