Akola crime: घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक

गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपी यास पोलिसांनी सखोल विचारपुस केली असता त्याने इतर गुन्हयाची सुध्दा कबुली दिली.





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करून, त्याच्याकडून एकुण ३ लाख ६० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरिक्षक शैलेश सपकाळ यांनी दिली.



२३ जुलै  रोजी पो.स्टे. चान्नी येथे फिर्यादी शरद गणेश चिपडे (वय २८ वर्ष. राहणार उमरा, पातुर) यांनी लेखी तक्रार दिली की, ते परीवारासह घरात झोपलेले असतांना कोणीतरी अज्ञात आरोपीने घराचे दार उघडुन आत प्रवेश करुन, त्यांचे घरातील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन व नगदी असा एकुण ५७,२००/-रु माल चोरुन नेला. यावरुन पोलिस स्टेशन चान्नी येथे अज्ञात आरोपी विरुध्द भा.दं.वि.  कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला.



स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गोपनिय माहितीवरुन लाखनवाडा येथील रहिवासी रावसाहेब सदाशिव पवार (वय ३० वर्ष,खामगांव-बुलढाणा) यास ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता, त्याने चान्नीत गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास या गुन्हयात अटक केली. त्याची पोलीस कोठडी रिमांड घेवून गुन्हयाचा तपास करण्यात आला.


गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपी यास पोलिसांनी सखोल विचारपूस केली असता, त्याने इतर गुन्हयाची सुध्दा कबुली दिली. 


आरोपी याने चान्नी येथील तीन तर पातूर येथे ४ गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी जवळुन गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल एकुण ७५ ग्रॅम सोन्याची लगडी किंमत ३,४५,०००/-रु,  एक मोबाईल किंमत १५,०००/- रु असा एकुण ३,६०,०००/- रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी  जप्त केला आहे.


ही कार्यवाही पोलीस अधिक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राउत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक शैलेश सपकाळ यांच्या नेतृत्वात मुकुंद देशमुख,  प्रमोद डोईफोडे, अश्विन शिरसाठ, फिरोज खान, शंकर डाबेराव, मनोज नागमते, संदीप टाले, प्रवीण कश्यप, भाग्यश्री मेसरे,  गणेश सोनोने यांनी केली आहे.

टिप्पण्या