- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
देशमुख हे ३० वर्षांपासून सूरज ज्वेलर्सचे मालक शिव कुमार वर्मा यांच्याकडे काम करीत होते
भारतीय अलंकार
मूर्तिजापूर: जयस्तंभ चौकातील व्यापारी संकुलातील सूरज ज्वेलर्स या सराफा दुकाना समोरच एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरूवार २७ नोव्हेंबरला उघडीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश देशमुख असून, ते याच दुकानात काम करायचे,अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
प्रकाश देशमुख हे शहरातील जुन्या सराफा लाईन येथील रहिवासी असून, ते ३० वर्षांपासून सूरज ज्वेलर्सचे मालक शिव कुमार वर्मा यांच्याकडे काम करीत होते. देशमुख यांनी दुकानाच्या वरच्या माळ्यावर जाऊन दोरी बांधून गळफास घेतल्याचे आज उघडकीस आले. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या आहे,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ही घटना मध्यरात्री घडली असावी, कारण सूरज ज्वेलर्स हे शहराच्या मुख्य रहदारी मार्गावर असल्याने रात्रीही या ठिकाणी तुरळक लोक असतात. देशमुख यांनी आर्थिक अडचणीतून आत्मघात केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूरचे ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा