Agriculture: राज्यातील चार कृषी विद्यापीठातील बारा हजार कर्मचारी-अधिकारी सामुहिक रजेवर

चारही कृषि विद्यापीठातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळाने ०४ नोव्हेंबरला शरद पवार,  दादाजी भुसे यांच्या भेटी घेतल्या होत्या.


अकोला : डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ सह राज्यातील चारही कृषि विद्यापीठात कार्यरत सर्व अधिकारी , कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी चारही विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकारी आज सामूहिक रजेवर गेले आहेत.



कृषि विद्यापीठ कर्मचा-यांना सुधारीत आश्वासित प्रगती योजनेसह ७ वा वेतन आयोग लागु करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलन दरम्यान चारही कृषि विद्यापीठातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ ०४ नोव्हेंबरला शरद पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे  विद्यमान कृषीमंत्री तसेच संबंधीत मंत्रालयीन अधिकारी , कर्मचारी यांच्या भेटी घेतल्या होत्या.



भेटीमध्ये नमुद विषयावर सविस्तर चर्चा होवून सदर लाभ पुर्व लक्षी प्रभावाने लागू करण्यात येतील त्याबाबत शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली. मात्र, यामध्ये शासन निर्णय कधी निर्गमीत होणार याबाबत कुठलीच स्पष्टता देण्यात आली नाही. त्यामुळे आज चारही विद्यापीठातील सुमारे बारा हजार कर्मचारी, अधिकारी यांनी सामुहिक रजा आंदोलनाचा निर्धारीत घेतला असून आज सामूहिक रजा आंदोलन केले.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारवर हे आंदोलन करण्यात आले.






"याआधी लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, उद्या पासून अधिकारी , कर्मचारी हे लेखणी बंद आंदोलन पुकारणार आहे."

डॉ संजय कोकाटे, 

अध्यक्ष, कृषी विद्यापीठ समन्वय संघ



टिप्पण्या