जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर दोघेही शेतकरी अकोला आकाशवाणी केंद्र टॉवर वरून खाली उतरून आंदोलन मागे घेतले.
भारतीय अलंकार
अकोला: कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांचे अकोला आकाशवाणी केंद्राच्या टॉवरवर चढून आज सकाळपासून आंदोलन सुरू होते. जिल्हा प्रशासनाने या आंदोलकांना विश्वासात घेऊन दुपारी खाली उतरविले. जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन द्यावे.जर का मागण्या पूर्ण झाल्या नाही.अन चॉकलेट देलं तर आम्ही हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करू,प्रत्येक टॉवरवर दहा शेतकरी चढून आंदोलन अधिक तीव्र करू,अशी चेतावणी आंदोलकांनी प्रशासनाला दिली.
आज सकाळी आकाशवाणी केंद्रात काम असल्याचं सांगून या दोन्ही शेतकऱ्यांनी केंद्राच्या आवारात प्रवेश मिळवला होता.आणि त्यानंतर हे दोन्ही शेतकरी टॉवरवर चढले होते. खरीप हंगामामध्ये झालेल्या कर्जमाफी न मिळाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळविण्यासाठी अनेकदा यांनी निवेदन देऊनही सरकारने लक्ष न दिल्याने शेवटी शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून सरकार विरुद्ध रोष प्रगट केला.
पोलीस आणि जिल्हा प्रशासन खाली उतरण्यासाठी त्यांच्या विनवण्या करत होते. मात्र,हे दोघेही शेतकरी जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत,तोपर्यंत खाली उतरणार नाही,अश्या भूमिकेवर ठाम होते.अखेर प्रशासनाने सर्व मागण्या पूर्ण करू असे आश्वासन देवून, शेतकऱ्यांना टॉवर वरून खाली उतरण्यास सांगितले. हे दोन्ही शेतकरी निमकर्द टाकळी ( Nimkarda takali)गावातील असून त्यांची नावे आकाश साबळे आणि गोपाल पोहरे अशी आहेत. दोन्ही शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.
सोयाबीन पिकाला भाव नाही. कर्जाचे पुनर्गठन नाही यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून,प्रत्येक शेतक-याला एकरी २५ हजार रूपयांची मदत तात्काळ द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सरकारचे लक्ष अकोल्यातील शेतकऱ्यांकडे वेधण्यासाठी या दोन शेतकऱ्यांनी टॉवर वर चढण्याचे अनोखे आंदोलन केले.
आकाशवाणीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
एरव्ही,आकाशवाणी परिसरात सामान्य नागरिक गेल्यास त्याची संपूर्ण चौकशी सुरक्षा रक्षक द्वारा केली जाते. प्रवेश द्वारापासूनच कडक नियम लावल्या जातात.आज मात्र,दोन शेतकऱ्यांनी थेट आकाशवाणीच्या टॉवरवर चढून येथील सुरक्षा यंत्रणा केवळ दिखावा असल्याचे सिध्द केले. बाहेरचे व्यक्ती टॉवरवर चढे पर्यंत येथील सुरक्षा यंत्रणा काय करत होती,हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांच्या मनात निम्मित उपस्थित झाला आहे.
हे सुध्दा वाचा:आकाशवाणीच्या टॉवरवर चढून दोन शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन
व्हिडिओ येथे पहा:आंदोलन मागे:प्रशासनाने दिले आश्वासन:आंदोलक टॉवर वरून खाली उतरताना
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा