Agriculture:आकाशवाणीच्या टॉवरवर चढून दोन शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन Agriculture: Unique agitation of two farmers by climbing the All India Radio tower

दोघेही शेतकरी जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत,तोपर्यंत खाली उतरणार नाही,अश्या भूमिकेवर ठाम आहेत



भारतीय अलंकार

अकोला: कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळवा, या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांचे अकोला आकाशवाणी केंद्राच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू आहे.



आज सकाळी आकाशवाणी केंद्रात काम असल्याचं सांगून या दोन्ही शेतकऱ्यांनी केंद्राच्या आवारात प्रवेश मिळवला.आणि त्यानंतर हे दोन्ही शेतकरी टॉवरवर चढले.  खरीप हंगामामध्ये झालेल्या कर्जमाफी न मिळाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळविण्यासाठी अनेकदा यांनी निवेदन देऊनही सरकारने लक्ष न दिल्याने शेवटी शेतकरी टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत.


पोलीस आणि जिल्हा प्रशासन खाली उतरण्यासाठी त्यांच्या विनवण्या करत आहेत. मात्र,हे दोघेही शेतकरी जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत,तोपर्यंत खाली उतरणार नाही,अश्या भूमिकेवर ठाम आहेत. हे दोन्ही शेतकरी निमकर्द टाकळी ( Nimkarda takali)गावातील असून त्यांची नावे आकाश साबळे आणि गोपाल पोहरे आहे. दोन्ही शेतकरी हे अल्पभूधारक असल्याचे कळते. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचा कळवळा असलेले पालकमंत्री या शेतकऱ्यांच्या भूमिकेवर काय कारवाई करतात,हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.



टिप्पण्या