YouthAward: जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

जिल्हा स्तरावर निवड झालेली संस्था राज्य स्तरीय पुरस्कार निवडीसाठी पाठविण्यात येईल व राज्य स्तरीय निवड झालेल्या संस्थेचा प्रस्ताव राष्ट्रीय स्तरावर निवडीसाठी पात्र राहील.



अकोला: ग्रामीण भागात युवा कल्याणसामाजिक व ग्रामीण विकासांकरीता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा संस्थासाठी  युवा कार्यक्रम  व क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा अकोला जिल्हातील युवा मंडळाना जिल्हा युवा पुरस्कार देण्याची योजना शासनातर्फे राबविल्या जात आहे.


पुरस्काराकरिता युवा मंडळाची निवड करताना त्यांनी केवळ एप्रिल २०१९ ते मार्च २०२० कालावधीतील केलेल्या कार्याचाच विचार करण्यात येईल.   


जिल्हा स्तरावर निवड झालेली संस्था राज्य स्तरीय पुरस्कार निवडीसाठी पाठविण्यात येईल व राज्य स्तरीय निवड झालेल्या संस्थेचा प्रस्ताव राष्ट्रीय स्तरावर निवडीसाठी पात्र राहील. जिल्हा स्तरीय पुरस्कार रु. २५,००० /- व प्रमाणपत्रराज्य स्तरीय विजेता संस्थेस रु. ७५,०००/- व प्रमाणपत्र तर राष्ट्रीय स्तरीय विजेता संस्थेस प्रथम विजेता रु. ३,००,०००/- ,व्दितीय १,००,०००/- ,तृतीय ५०,००० /- रुपये व मानपत्र प्रदान करण्यात येईल. मंडळांच्या पदाधिकारी यांचे वय ३१ मार्च २०२० ला  २९ च्या आत असावेमागील  दोन वर्षात मंडळाने उपरोक्त पुरस्कार प्राप्त केलेला नसावा तसेच मंडळ नेहरू युवा केंद्राशी संलग्न असणे व सण २०१९ - २०२० चा ऑडिट रिपोर्ट असणे बंधनकारक राहील.



पुरस्काराकरिता आवेदन करणाऱ्या युवा मंडळांनी नमुना अर्ज नेहरू युवा केंद्र वसंत देसाई स्टेडियमदुसरा माळाअकोला ता. जि. अकोला  या कार्यालयातून  ४ नोव्हेंबर २०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष प्राप्त करावा. पूर्ण भरलेले आवेदनपत्र  संस्था आणि नोंदणी पत्र घटनावार्षिक अहवालफोटोबातमी व अंकेक्षण रिपोर्ट अन्य आवश्यक कागद पत्रासह  १० नोव्हेंबरचे आत सादर करून या सुवर्ण संधीचा फायदा अकोला जिह्यातील युवक मंडळांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन युवा समन्वयक महेश सिंह शेखावत यांनी केले आहे.       

टिप्पण्या