- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
२५ डिसेंबर पासून धुळे येथे या लीग कबड्डी स्पर्धेला सुरुवात होणार असून त्यासाठी अकोला जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे.
Selection of Sanjay Maind as Youth Pro Kabaddi Akola District Chief Coordinator
अकोला: अकोला जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव तथा विदर्भातील कबड्डी क्षेत्रातील नामवंत राष्ट्रीय कबड्डी पंच व आयोजक संजय मैंद यांची युवा खेलकूद अभियान संचालित युवा प्रो कबड्डी लीग च्या अकोला जिल्हा मुख्य समन्वयक तथा सर्वाधिकार पदी निवड करण्यात आली आहे.
२५ डिसेंबर पासून धुळे येथे या लीग कबड्डी स्पर्धेला सुरुवात होणार असून त्यासाठी अकोला जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे लवकरच आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्रात अश्या स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील निवड चाचणी मधून १४४ मुले व ४८ मुलींची निवड करण्यात येणार असून, मुलांचे १२ तर मुलींचे ४ संघ तयार करण्यात येणार आहे.
संजय मैद यांचे जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रातून अभिनंदन होत असून, त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय प्रा. तुकाराम बिरकड, गुलाबराव गावंडे, वासुदेव नेरकर, विजय खोकले, अंबादास मागे, शत्रुघ्न बीरकड, मंगेश काळे, राजू दहापुते, प्रभाकर रूमाले, प्रदीप थोरात आदींना दिले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा