wildlifeweek2020: वाघ,बिबटचा सुध्दा फडशा पाडणारा रानकुत्रा

वन्यसृष्टीत आज जाणून घेवूया रानकुत्रा या प्राण्यांच्या विषयी रंजक माहिती


मोठ्या शक्तिशाली प्राण्यांवरही एकजुटीने शिकार हेरून हल्ला करून त्यांना अपले भक्ष बनवितात. वेळ पडल्यास बिबट, वाघ अशा प्राण्यांवरही हल्ला करून त्यांना ठार करतात. 

              Indian Wild dog



                      रानकुत्रा  
हा रान कुत्रा दिसायला आपल्या गावाकडील कुत्र्या सारखे असले तरी गावाकडील कुत्र्याशी काही संबंध नाही. सहसा गावाकडे फिरकत नाही. दाट जंगलांत, अभयारण्यात हे कळपाने राहतात. एका कळपात अनेक कुटुंबे एकत्र राहतात आपल्या पिल्लांन सोबत इतर सर्वच एकमेकांच्या पिल्लाचे व जखमी साथीदारची काळजी घेतात. त्यामुळे सर्व मिळून मोठ्या प्राण्यांची शिकार सहज करु शकतात. चितळ, सांबर, भेकर, रानडुक्कर हे आवडते खाद्य. मोठ्या शक्तिशाली प्राण्यांवरही एकजुटीने शिकार हेरून हल्ला करून त्यांना अपले भक्ष बनवितात. वेळ पडल्यास बिबट, वाघ अशा प्राण्यांवरही हल्ला करून त्यांना ठार करतात. 


सावजाला मारण्याची त्यांची पद्धती फारच वेगळी व मजेशीर असते. वासावरून सावज हेरल्यानंतर त्यांचा पुढारी प्रथम कशाप्रकारे हल्ला करावयाचा ती योजना करून सर्वांना त्याची कल्पना देतो. सावजाला पळवून थकवितात मग त्याला हेरून सर्व जण एकजुटीने हल्ला करून भक्षयाला अपल्या ताबयात घेतात व जिवंत असताना क्रुरपणे त्याचे लचके तोडुन खातात. 


आकाराने थोडा मोठा असुन जमिनीपासून साधारणतः ४३ ते ५५ सें.मी. उंच असून डोके व धड धरुन लांबीला साधारण ९० सें. मी. व शेपूट जवळजवळ ४५ सें.मी. लांब व वजन सुमारे २० कि.ग्र.माद्या मात्र वजनाने थोड्या कमी. कान टोकाकडे गोलसर. रंगानी तपकिरी पिवळा तोंडवर काळा, खालील जबडा व गळ्या कडील शाती व पोटाकडील भाग पांढरा,. गोल झुपकेदार तपकिरी काळी शेपटी टोकाला काळी रंगावरून सहज ओळखू येतात. 


उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाचा गरमी सहन न झाल्याने मधूनमधून पाण्यात जाउन बसणे व थंड ठिकाणी पसंत करतात.
त्यांच्या प्रजोत्पादनाचा काल नोव्हेंबर-डिसेंबर . जानेवारी–फेब्रुवारी मध्ये सुमारे ४–६ पिल्लांना गुहेत, बिळात किंवा खडकांच्या खाली जन्म देतात. जवळपासच्या त्याच काळात सर्व मादी प्रसवतात व पिल्लांना लपवून ठेवुन सर्व मिळून सांभाळ करतात. 

                                        देवेंद्र तेलकर
                             वन्यजीव अभ्यासक

टिप्पण्या