WildlifeWeek2020: जंगलात राहणारा अतिशय धूर्त व धाडसी प्राणी 'लांडगा'

                  वन्यसृष्टी  

आज जाणून घेवूया लांडगा या वन्य प्राण्यांविषयी रंजक माहिती



सहजासहजी भक्ष मिळत नसेल  तर ते रात्रीच्या वेळी गावात येवुन, माणसांची पाळलेली लहान जनावरे शेळ्यामेंढ्या व कोंबड्या यांना पळवितात. ते प्राण्यावर क्रुरपणे हल्ला करुन मरण्याची वाट न पाहता त्याचे लचके तोडून खातात.

A very clever and brave animal that lives in the forest.
 

     
           Indian Wolf लांडगा

लांडगा हा प्राणी अपल्या जास्त परिचयाचा नाही. कारण हा सहसा नजरेत पडत नाही. कुत्र्याच्या कुळातील निशाचर मांसभशक वन्यप्राणी आहे. खुरटे व खुल्या जंगलात, गवताळ प्रदेशात दगडी कपारींत किंवा जमीन उकरून खड्यात वास्तव्य करतात. तसेच पानझडी,दाट वृक्षांचा जंगलात राहणारा अतिशय धूर्त व धाडसी, दोन किंवा तीनच्या समुहाने राहतात.



सामान्यतः राखाडी-लाल व तपकिरी काळया पांढर्‍या रंगाचे केस , विशेषत: खांद्यां भोवतीचा गडद रंगाचा पट्ट्यांचे फर सारखे मोठे केस व गळ्या कडील भागावर तपकिरी, काळे पांढरे रंगाची केस व शाती कडील भाग मळकट पांढरा, तपकिरी काळया रंगाची झुपकेदार शेपटी व टोकाला काळी. त्याचे डोके मोठे आणि जड व, रुंद कपाळ, उभे कान, तीक्ष्ण घ्राणेंद्रिय,मोठा व मजबूत जबडा व मोठे दाढ असल्याने हाड चिरडणे सहज शक्य होते.


 
लांडगे जंगलात दिवसा व रात्री केव्हाही शिकार करतात. काळविट, चिंकारा सारख्या प्राण्याला व त्यातील एखाद्या आजारी किंवा जखमी प्राण्याला निवडून कळपातून वेगळे करू शकतात आणि त्यांचा मागे लागुन थकवुन हल्ला करुन शिकार करण्यात बर्‍याचदा यशस्वी होतात. सहजासहजी भक्ष मिळत नसेल  तर ते रात्रीच्या वेळी गावात येवुन, माणसांची पाळलेली लहान जनावरे शेळ्यामेंढ्या व कोंबड्या यांना पळवितात. ते प्राण्यावर क्रुरपणे हल्ला करुन मरण्याची वाट न पाहता त्याचे लचके तोडून खातात.


लाडग्यांचे पायांचा ठसे बिलकुल कुत्र्यासारखी असून आकाराने मोठे असतात. चालताना लांडग्याचा समोरचा व मागचा पाय सरळ रेषेत पडतात. पंजा तिन ते चार इंच रुंद आणि साडेतीन (मागचा) आणि साडेचार इंच लांब (समोरचा) पंजा प्रौढ लांडगाचा , तर कुत्राच्या बर्‍याच जातींमध्ये पाय तिन ते साडेतीन इंच लांब असतात. कुत्र्यांचा पुढचा आणि मागील पंजा प्रिंट सामान्यतः संरेखित नसतात. पण दोघांच्याही बोटा समोर नखाचे दिसतात.



साधारणपणे त्याचा मिलन काळ पावसाळ्याच्या शेवटी शेवटी म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर. मादीच्या गर्भधारणेचा कालावधी सामान्यत: सुमारे ६५ ते ७५ दिवसाचा असतो. त्यानंतर कुत्राप्रमाणे ३ ते ८ पिल्लांना जन्म देतात. पिल्ले जन्मजात अंध असतात. तर १०-१२ दिवसात त्यांचे डोळे उघडतात. तरीपण मादी अडीच तिन महिने पिल्लांना बाहेर काढत नाही. नर व मादी दोघे मिळून पिल्लांची काळजी घेतात. दोन वर्षांत पूर्ण वाढ होऊन पिल्ले परीपक्व होतात. पूर्ण वाढलेला लांडगा उंची साधारण ६०-७५ सें. मी. लांबी सुमारे ९०-१०५ सें. मी. व शेपटी ३५ ते ४० सें. मी. जाड व झुपकेदार असते व वजन सरासरी सुमारे २० ते ३० कि.ग्र. असते. लांडग्यांचे सरासरी आयुष्यमान ८-१३ वर्षे असते.

                                  -  देवेंद्र तेलकर
                            वन्यजीव अभ्यासक,
                           माजी वन्यजीव रक्षक

टिप्पण्या