WildlifeWeek2020: जंगलातील स्वच्छतादूत तडस

                   वन्यसृष्टी
आज जाणून घेऊया तडस या वन्य प्राण्यांच्या विषयी रंजक माहिती


तरस प्राणी जरी अगदी बेढब व मळकट दिसत असला तरी तो निसर्गातील आपले साफसफाईचे उत्तम काम करतो.

Striped Hyena तडस/तरस


जंगलाचा स्वच्छक म्हणून मानला जाणारा  तडस हा प्राणी. पूर्णपणे वाढ झालेला तडस साधारणपणे १३०- १५० सें.मी. लांब व  साधारण ९० सें.मी. ऊंच. नराचे वजन साधारणपणे ४० - ४५ कि.ग्र. व मादीचे वजन ३०-४० कि.ग्र असते.


दिसायला  साधारण कुत्र्याप्रमाणेच , पुढील अंग व डोके जाड आणि मागील शरीर निमुळते असल्याने सहजपणे ओळखु येतो. त्याच्या मानेवर अयाळी सारखे मळकट हलके मळकट पांढरे राखाडी लांब केस व शरीराचा रंग मळकट तपकिरी राखाडी असून अंगावर व पायावर अडवेपट्टे असतात. 


डोंगराळ भागात, बांबूच्या वनांत तसेच ऊंच वाढलेल्या गवतात देखील लपून राहतात. बऱ्याच वेळा ते सायाळींनी खोदलेली बिळे आणखी मोठी करून घेउन तेथे राहतात.


निशाचर प्राणी असल्याने रात्र पडली की भक्षयाच्या शोधात बाहेर पडतात व दिवस उगवण्यापूर्वी आपल्या गुहांमध्ये परत येतात. दिवसा गुहेत, कोनाडे, खड्डे, दाट झाडे, नद्या आणि हिरवे गवत येथे लपून बसतात. 


बहुत करून तडस एकटे व जोडीजोडीने फिरताना दिसतात. परंतू क्वचितच  ५-६ तडस एकत्र बाहेर पडताना दिसून येतात. तडसांच्या पावलांचे पंज्या जवळजवळ कुत्र्यासारखेच तिन ते सव्वाचार सेमी असुन पण थोडे लांबुळके व बोट थोडी मोकळे असुन बोटा समोर नखाचे व्ही आकाराचे निशान पायांचा ठस्यावर स्पष्ट दिसतात. शरीराचा जास्तीत जास्त भार पुढील पायांवर असल्या मुळे अधिक स्पष्ट दिसतात. व मागील पाय फारच हडकुळे असल्या मुळे फारच अस्पष्ट दिसतात. 


दातांची रचना कुत्रासारखीच असुन जबडा मजबुत असल्याने. मेलेल्या जनावराचे कुजलेले मास व उरलेली शुष्क झालेली हाडे. हाड चिरडणे सहज शक्य होते आणि आवडीने खातात, त्यामुळे त्याची विष्ठा देखील अतिशय कडक व पांढरेगोळे अशी असते.


समागमाचा काळ साधारणतः हिवाळ्याच्या शेवटी असतो. गर्भधारणा नंतर ९० ते ९२ दिवसात ऊन्हाळ्यात २ ते ४ पिल्लांना जन्म देतात. तरस प्राणी जरी अगदी बेढब व घाणेरडा दिसत असला तरी तो निसर्गातील आपले साफसफाईचे उत्तम काम करतो.
  
                                   -  देवेंद्र तेलकर
                             वन्यजीव अभ्यासक

टिप्पण्या