Wildlifeweek 2020: खुल्या झुडपी माळरानावर राहणारा खोकड

दिवसभर बिळात विश्रांती करतात. लहान कौटुंबिक गटात राहणे पसंत करतात...    

वन्यसृष्टी मध्ये आज जाणून घेवूया खोकड या प्राण्यांविषयी रंजक माहिती

 that lives in an open shrub


          *Indian Fox खोकड*
कुत्र्याच्या कुटुंबातील सर्वात लहान सदस्य आहे. भारतात सर्वत्र आढळुन येणारा मुंदर बारीक शरीरयष्टी व निक्ष्याचर असुन कधीकधी सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी दिसतात.



दिसायला निमुळते लहान तोड, लहान डोळे असुन फक्त होटाचा व नाकाचा भाग तेवडा काळा,अंगावर लहान फर, मोठे कान, अंगावर सुंदर आणि तपकिरी पिवळा केसाळ कोट, गळा व पोटाकडील भाग मळकट पांढरा आणि जवळपास शरीराचा अर्धा लांबीची मऊ ब्रश सारखी झुपकेदार शेपटी व टोकावर काळे केस आहे, आणि पाय तांबूस असतात.
 

डोके आणि शरीराची लांबी ६० सेमी., शेपटोची लांबी-२५ से २५ सेमी. वजनानी फक्त २ते ३ किंलो. जंगल क्षेत्रात न राहता खुल्या झुडपी माळरान व शेती क्षेत्रात नाल्यानी राहतात. जमिनीत किंवा झुडपा खाली आपले बीळ उकरून  ६० ते ९० सेमी आकाराची एक छोटी खोली सारखे बिळ बनवुन त्यात येण्या जाण्याचा अनेक वाटा बनवतात. थोडीही चाहूल लागताच शेपटीच्या सहाय्याने चपळ हालचाली वर नियंत्रण करत स्वसंरक्षण करत पळुन जातात.


लहान सस्तन संधीसाधू प्राणी असून, मिश्राहारी आहे. आहारात सरपटणारे प्राणी भक्ष्य उदीर व खेकडे, वाळवि, किडे, लहान पक्षी खाद्य नष्ट करुन करन शेतकऱ्यांना मदत करतो. तसेच टरबूज, खरबूज इतर फळ व बोरीची फळा सोबत फकड्या व मुंग्यां पण खाताना दिसतो.


मीलन कालावधी हिवाळ्यात.गर्भधारणा कालावधी ७ ते ८ आठवडे एकावेळी चार पिल्लांना जन्म देवुन पिल्लांचे संगोपन करतात.

                                   -देवेंद्र तेलकर
                          वन्यजीव अभ्यासक
                            मा. वन्यजीवरक्षक

टिप्पण्या