Wildlife week2020: तुम्हाला माहीत आहे का, अस्वलाला मधमाश्या का दंश करू शकत नाही?

आज वन्यसृष्टीत जाणून घेऊया अस्वल या प्राण्याच्या विषयी रंजक माहिती

Do you know why a bee can't bite a bear?


अस्वल  Bear 
भरभक्कम शरीर, काळा रंगाचे लांब केस व मोठी नखे. मिश्राहारी व  निशाचर. दाट जंगलांमध्ये अस्वले दिसून येतात. 




उंची सुमारे ५० सें.मी. पासून ७५ सें.मी. व लांबी डोके धरुन १३५ ते१८५ सें.मी.ईतकी असते पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सुमारे १२५ ते १४० किलो  असते. मादीचे वजन ७०-९० कि.ग्र. व छातीवर इंग्रजी “व्ही” अकाराचा मळकट पांढरा पट्टा व लांब नख असतात. 


अस्वले सामान्यतः दाट जंगलांत खडक कपारींच्या जागा अथवा नैसर्गिक गुहांमध्ये राहतात. सूर्यास्तापूर्वी ते खाद्याच्या मागावर बाहेर पडतात. व सुर्योदयाबरोबर विश्रांती साठी आश्रयाला येतात. थंड व ढगाळ हवा असल्यास तसेच मनुष्यायाचा वावर नाही अशा ठिकाणी दिवसभर देखील बाहेर दिसु शकतात. 


त्याचे आवडते खाद्य पाला पोचोळाखाली असलेले कीटक, मुंग्या आहे. तसेच उधळीच्या व कंद मुळांच्या शोधात खड्डे उकरतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची फळे व ऊन्हाळ्यात त्यांना वड, पिंपळ, ऊंबर, अंबे, जांभळे, बेल तसेच उस बोर व इतर फळे आणि ईत्यादी फळांशिवाय झाडांवर मधमाश्यांची पोळी खाण्यासाठी झाडावर चढतात. 


मोठे व मजबुत नाखांची झाडांवर चढण्यास मदत होते. त्याच्या अंगावरील दाट केसांमुळे मधमाश्याचे दंश शरीरापर्यंत पोहोचणे कठीणच.जंगलातील मोहाची झाडे बहरतात, तेंव्हा त्याची स्वारी तिकडे वळते. ही आवडीचे फुले पोटभर खाउन झिंगून तेथेच सावलीला आडवी होतात.


समागमाचा काल साधारण मार्च - मे सात मासाच्या गर्भधारणे नंतर साधारण नोव्हेम्बर-जानेवारीच्या दरम्यान दोन किंवा तिन पिल्लांना जन्म देतात. पिल्लाचे संगोपन मादी फारच काळजीपूर्वक करते. त्याकरिता ती पिल्लांना सुरवातीच्या काळात पिल्लांना पाठीवर घेऊन फिरताना दिसते. अडीच ते तीन वर्षेपर्यंत पिल्ले आई बरोबर राहतात. नंतर वयात अल्यावर त्यांना सोडून जोडीदार शोधतात. 


                                    -देवेंद्र तेलकर 
                            वन्यजीव अभ्यासक

टिप्पण्या