Wildlife Week 2020: महाराष्ट्रात अकोला, अमरावती, भंडारा व चंद्रपूर येथे आढळतात वाघ

वाघाला रहावयाला हिरवीगार दाट अशी जंगले आवडतात. महाराष्ट्रात अकोला, अमरावती, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यात  अढळून येतात.

वन्यजीव साप्ताह निमित्त 'वन्यसृष्टी' मध्ये वन्य प्राण्यांची ओळख करून देत आहेत,वन्य अभ्यासक  देवेंद्र तेलकर


Wildlife Week: Tigers are found in Akola, Amravati, Bhandara and Chandrapur in Maharashtra


आज जाणून घेवू या पट्टेदार वाघा विषयी रंजक माहिती


पट्टेवाला वाघ   Tiger 
वाघ हा मांजर कुळातील असुन भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. वाघ म्हटला म्हणजे अपल्या डोळ्यासमोर एक मोठा बलशाली प्राणी उभा रहातो. 

जेवढे वजन भारी त्यापेक्षा चपळता न्यारी

पूर्ण पणे वाढलेला नर वाघ सुमारे  ९ ते ९॥ फूट लांब असतो. केंव्हा केंव्हा १० ते १२ फुटांपर्यंत त्याची लांबी भरते. नराचे वजन साधारणतः १८० ते २३० कि.ग्र .पर्यंत असु शकते. 

मादी साधारणपणे ८-१० फूटा लांब असून तिचे वजन ३०० ते ४०० पौंड भरते.
वाघाचे शरीर जरी लांब व वजनदार असले तरी त्याच्या हालचालीत फारच चपळता असतो. 

वाघाला आवडते हिरवळ

वाघा वाघां मध्ये अंगावर वरील पट्यापट्यात फरक अढळून येतो. त्यामुळे वाघ ओळखण्यास मदत होते. वाघाला रहावयाला हिरवीगार दाट अशी जंगले आवडतात. महाराष्ट्रात अकोला, अमरावती, भंडारा व चंद्रपूर ह्या जिल्ह्यां मध्ये अढळून येतात. 

वाघ आपली राहण्याची जागा पसंत करताना पढील गोष्टी प्रामुख्याने पहातो. त्याला हरणे, सांबरे इत्यादी मोठ्या प्राण्यांचे भरपूर खाद्य मिळू शकेल तसेच विश्रांती घेण्यासाठी व निवाऱ्याची जागा व तहान भागविण्यासाठी भरपूर पाणी जेथे असेल तीच जागा तो राहण्यासाठी पसंत करतो. 

साधारणतः दुपारचे ऊन टाळून संध्याकाळ पासुन सकाळपर्यंत बाहेर असतो. परंतू दिवसा ऊन नसून ढगाळ वातावरण असेल  तर तो तेंव्हाही शिकारीवर निघतो. 

शिकार नाही मिळाली तर...

वाघाला हरणे, सांबर याच बरोबर रानडुक्करे, गवे हे आवडीचे असुन हरणे, नीलगाय , रानडक्करे मोठमोठ्या सायाळी ईतकेच काय तर वेळ पडल्यास बिबट अस्वल व भुकेच्या वेळेस त्याला काहीच शिकार मिळाली नाही तर तो कुत्रे, कोंबड्या , मासे, सरपटणारे प्राणी हे देखील खातो. 

काहीच न मिळाल्यास तर तेथे गावातील जनावरांचीही शिकार करतो. ही सवय त्याला लहानपणा पासूनच त्याच्या आई वडीलांच्या पासुन लागलेली असते.


वाघ सफाईदार पोहतो

वाघ पाण्यामध्ये अगदी सफाईदार पणे पोहू शकतो. तो एरव्ही झाडावर विशेष चढत नसला तरी जरुर पडल्यास झाडावरही उत्तम रीतीने चढू शकतो.

समागमानंतर होतात विभक्त

वाघांच्या समागमाचा काळ साधारणतः पावसाळ्या नंतरचा असलेला दिसून येतो. वाघ समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. 

मादी गर्भ धारणा नंतर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर ३-४ बछड्यांना जन्म देते. 

सहा महिन्यानंतर शिकार

वाघाच्या पिल्लाचे जन्मतः वजन सुमारे 1 किलो असते आणि ते अंध असतात. साधारण १०- १२ दिवसात डोळे उघडल्यावर बघू शकतो. 

पिल्लू संपुर्णतः त्याच्या आई वर अवलंबून असते. वाघीण सुमारे 2 महिन्यांपर्यंत पिल्लाला दूध देते. तोपर्यंत  पिल्लाला दुधाचे दात आलले आसतात. 

त्यानंतर  हळूहळू मास देण्यास सुरुवात करते.पिल्ले साधारणपणे ६ महिन्यांनंतर शिकारीला बाहेर पडतात. जवळपास १८ ते २४ महिने ते आपल्या आई सोबत राहुन शिकारीचा सराव करतात. 


दातांची वाढ
तो पर्यंत (दिड वर्षा पर्यंत) कायमरवरूपी
२८ तर क्वचितच ३० पक्के दात येतात.वरच्या व खालच्या जबड्यांमध्ये समोर मास पिसे तोडून अथवा सोलून काढण्या करीता ६ वर ६ खाली त्याच्या आजुबाजुला एकेक असे २ वर २ खाली असे ४सुळे (५. ते ७.५सेमी)  त्यानंतर चावून खाण्यासाठी दोन्ही बाजूला  ४ वर ३ खाली दाढ असे १४ अथवा १६ वर  आणि १४ खाली एकुण २८ अथवा ३० दात आसतात.

चालताना आवाज करीत नाही

वाघाच्या पायांची गादी मऊ असल्याने चालताना आवाज होत नाही. समोर पाच तर मागे चार असे १८ बोट असुन समोरच्या पाचव्या बोटाचा वापर शिकार वा इतर ठिकाणी पकड घेण्यासाठी होतो.

पण चालताना अंगठा म्हणजे पाचवे बोट जमीनीवर टेकत नाही. चालताना इतर वेळी बोटाची नखे मासाच्या अस्तरात असल्याने पंजा सोबत नखे बाहेर दिसत नाही, पण बोटाच्या स्नायू वर विशिष्ट दबाव आल्यावर बाहेर येतात. 


वाघांचे आयुष्य मर्यादा सुमारे ३० वर्षांपर्यंतचे आहे. 


                                          लेखक                                    
                                     - देवेंद्र तेलकर
                              वन्यजीव अभ्यासक.
                     तथा  मानद वन्यजीवरक्षक

टिप्पण्या