Wildlife week 2020: भारतातील पाच मोठ्या मांजरी पैकी एक बिबट्या

                  वन्यसृष्टी

आज जाणून घेवू या बिबट्या विषयी रंजक माहिती



बिबट्याला शिकारीसाठी कोणतेही जनावर चालते. हरणे, माकडे, काळवीट, निलंगा, गाईगुरे गटांतील देखील व लहान सहान प्राणी तसेच मोठमोठ्या सायाळी यांची देखील शिकार त्याला चालते. माकडाची व कुत्र्याची शिकार त्याला फारच आवडते.

     Leopard 


बिबट आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहेच. हा मांजर कुळात येतो. पूर्णपणे वाढ झालेल्या नर बिबटची लांबी सुमारे २००-२१० सें.मी. (७ फू ट) व मादी लांबीला १७०-१८० सें. मी. असते. नराचे वजन सुमारे ५० कि.ग्र . पासून ७० कि.ग्र. व मादीचे साधारणतः ४० प- ५० कि.ग्र. पर्यंत असते. जमिनीवर ताशी ५८ - ६० किलोमीटर वेगाने धावू शकतो आणि उत्तमरीत्या पाण्यात पोहू शकतो.


भारतातील पाच मोठ्या मांजरी पैकी बिबट्या एक आहे. त्याची सरासरी लांबी १७० ते २८० सेंमी असू शकते. बिबट्यामध्ये नर मादी पेक्षा मोठा व भरभक्कम शरीरयष्टी असलेला असतो . नराचे वजन सरासरी ३५ ते  ७० किलो इतके भरते तर मादीचे वजन सरासरी २८ ते ५८ किलो इतके असते.बिबट्याची उंची सरासरी ४३ ते ७६ सेंमी इतकी भरू शकते. 


बिबटच्या कातडी दिसायला सुंदर व मऊ व रंग पिवळा असून त्यावर पिवळ्या रंगावर काळ्या रंगाच्या ठिपक्याचे गोल  रिंगण असते.


बिबट्या कुठेही व कशाही परिस्थितीत राहू शकतो. माळरान, खडका कपारींत तसेच साधारण जंगलांतही राहू शकतो.


बिबट सहसा निशाचर असला तरी जर त्याला रात्रीची शिकार मिळू शकली नाही तर तो दिवसा देखील शिकारीच्या मोहीमवर निघतो. बिबट्याला शिकारीसाठी कोणतेही जनावर चालते. हरणे, माकडे, काळवीट, निलंगा, गाईगुरे  गटांतील देखील व लहान सहान प्राणी तसेच मोठमोठ्या सायाळी यांची देखील देखील शिकार त्याला चालते.  माकडाची व कुत्र्याची शिकार त्याला फारच अवडते. प्रसंगी मोठे खाद्य मिळाले नाही तर पक्षी, खेकडे तसेच सरपटणारे प्राणी देखील खावून भूक भागवतो.



बिबट मनुष्य वस्तीच्या असपास फिरकतात अशावेळी ते गाईवासरे, बकऱ्या, गाढवे, कुत्रे पाळीव प्राण्यांवर व हल्ला करु शकतो. परंतु जंगलांत जंगली जनावर अपली भूक भागवता साठी जनावरांचा माग काढीत शिकार साधतात. बिबट जरी लहान असला तरी त्याची शक्तीशाली व चलाख आहे. शिकारी मध्ये कोणी वाटेकरी होऊ नयेत म्हणून तो झाडावर चढून सुरक्षित जागी ठेवतो. 



मिलन कालावधी वर्षेभर

बिबट्याचा तसा ठराविक प्रजनन काळ नाही. प्रजनन काळात नर व मादी फक्त ५ ते ६ दिवस एकत्र राहून मिलन करतात. मादी ९० ते १०५ दिवस गरोदर राहुन साधारण ३-४ पिल्लांना जन्म देते व पिल्ले पुढचे दीड ते दोन वर्षे फक्त मादीच संगोपन करते. 


जन्मतः पिलांचे वजन अर्धा किलोच्या आसपास असते. डोळे जन्मतः बंद असुन १०- ११ दिवसानंतर डोळे उघडतात.२० ते २५ दिवसानंतर ऐकायला यायला सुरुवात होते. ५० ते ६० दिवसाचे पिल्लं व्यवस्थित चालायला लागतात, त्याच बरोबर  त्या काळात दुधाचे दात पण येतात व ९० दिवसानंतर मांस खायला सुरुवात करतात. साधारणपणे दिड वर्षापर्यंत २८ तर क्वचितच ३० पक्के कायमरवरूपी दात येतात. 


वरच्या व खालच्या जोड्यांमध्ये समोर मास पिसे तोडून अथवा सोलून काढण्या करीता ६ वर ६ खाली त्याच्या आजुबाजुला एकेक असे २ वर २ खाली असे साधारण ३ ते ४.५ सेमी चे ४ सुळे व त्यानंतर चावून खाण्यासाठी दोन्ही बाजूला  ४ वर ३ खाली दाढ असे १४ अथवा १६ वर  आणि १४ खाली एकुण २८ अथवा ३० दात आसतात.



बिबट्याच्या पायांची गादी मऊ असल्याने चालताना आवाज होत नाही. समोर पाच तर मागे चार बोट असे १८ बोट असुन समोरच्या पाचव्या बोटाचा वापर शिकार अथवा इतर ठिकाणी पकड घेण्यासाठी होता, पण चालताना अंगठा म्हणजे पाचवे बोट जमीनीवर टेकत नाही. तसेच चालताना बोटाची नखे मासाच्या अस्तरात असल्याने पंज्याच्या सोबत नखे बाहेर दिसत नाही, पण बोटाच्या स्नायू वर विशिष्ट दबाव आल्यावर बाहेर येतात.

  

                                      लेखक

                                 -देवेंद्र तेलकर

                          वन्यजीव अभ्यासक

                                      तथा 

                           मानद वन्यजीवरक्षक

                                    अकोला



(माहिती आवडल्यास share करा)

टिप्पण्या