VBA: पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी दौरा करावा व तात्काळ मदत जाहीर करावी - ॲड. प्रकाश आंबेडकर

परतीच्या पावसाने राज्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

                                       filephoto


पाटणा, दि. १७: परतीच्या पावसाने राज्याला झोडपून काढले असून नदी-नाल्यांना महापूर आला आहे. राज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून काढणीसाठी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा, जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


परतीच्या पावसाने राज्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी हताश झाला असून तो आता सरकारच्या मदतीची अपेक्षा करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थिती असलेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीम बरोबर बैठक घेऊन जी काही मदत देता येईल. त्याची तात्काळ घोषणा करावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

टिप्पण्या