- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण व सामाजिक न्यायाच्या समीक्षेसाठी २ आक्टोंबरला महात्मा गांधी जन्मदिनाचे औचित्य साधून वर्धा जिल्ह्यातून सत्याग्रहाची सुरवात करण्यात आली.
Statewide agitation for upliftment of Scheduled Castes from Wardhaभारतीय अलंकार
वर्धा: महात्मा गांधी जयंती निम्मित २ आक्टोबरला वर्धा येथील गांधी पुतळ्या जवळ भव्य मंडप टाकून एक दिवशीय सत्याग्रहाला राज्यमंत्री (दर्जा) तथा राष्ट्रीय लहु शक्तीचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव कांबळे बसले होते. स्वतंत्र भारतासाठी सत्याग्रहची बीज ज्याठिकाणी रोवण्यात आले होते,त्या वर्धा जिल्हातूनच शुक्रवारी अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी राज्यभर आंदोलनाचा शंखनाद करण्यात आला.
सत्याग्रह मंडपामध्ये उमरखेड मतदार संघाचे आमदार नामदेवराव ससाने तथा मांगगारोडी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व वर्धा नगर परिषदेचे शिक्षण सभापती कैलास राखडे वर्धा, वाल्मिकी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मदन चावरे , वर्धा जिल्हा वाल्मिकी समाजाचे डाॅ. सुनिल चावरे, शितल खंडारे सभापती नगर परिषद हींगणघाट, राजेश अहिव (आर्वी) फकीरा खडसे (माजी जि.स.) वर्धा, गणेशदास गायकवाड अमरावती, कांबळे औरंगाबाद आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वांनी मधुकरराव कांबळे यांनी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा केलेल्या शंखनाद आंदोलनाचे स्वागत केले. या आंदोलनाचा लढा महाराष्ट्रभर तीव्र करण्याची शपथ सर्वांचे संमतीने घेण्यात आली. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती मधील मांतग, वाल्मिकी, चर्मकार, मांगगारोडी समाज भारतीय संविधानात दिलेल्या आरक्षणा पासून कोसो दूर आहेत याकरिता अनुसूचित जातीचे आरक्षणाचे अ,ब,क,ड, प्रमाणे वर्गीकरण करून अनुसूचित जाती मधील वंचित समाजांना सरकारनी न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
उमरखेडचे आमदार नामदेवराव ससाने यांनी ही मागणी विधान सभेत लावून धरण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
मधुकरराव कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणा करून सत्याग्रह आंदोलनाच्या करण्यामागील हेतू स्पष्ट करून,प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल,असे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री तथा वर्धा जिल्हा पालकमंत्री सुनिल केदार यांना मागण्याचे लेखी निवेदन देण्यात आले.
काय आहेत प्रमुख मागण्या
* अनुसूचित जातीचे आरक्षणाचे अ,ब,क,ड, प्रमाणे वर्गीकरण करावे.
*साहित्यरत्न लो.अण्णाभाऊ साठे ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.त्यांचे स्मारकासाठी रू.५००/_कोटी निधी द्यावा.
* साहित्यरत्न लो.अण्णाभाऊ साठे ह्यांचे नाव मुंबई विद्यापीठाला द्यावे.
* बार्टी पुणेच्या धरतीवर साहित्यरत्न लो.शा.अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था , आर्टीची स्थापना करावी.
* आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग आयोगाच्या शिफारशीची अमलबजावणी त्वरीत करावी.
*आद्यक्रांतीविर लहुजी साळवे यांचा संगमवाडी पुणे येथील स्मारकाला रू.२००/कोटी निधी द्यावा.
* महाराष्ट्रातील बॅन्ड कलाकार व व्यावसायिकांना सानुग्रह अनुदान म्हणून २५ हजार देवुन बॅन्ड वाजविण्यांची परवानगी ध्यावी.
* सामाजिक न्यायची समीक्षा करावी.
या आठही मुद्यावर मधुकरराव कांबळे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले .वर्धा जिल्हयातील अनुसूचित जाती मधील वंचित समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते .यापुढे वंचिताना न्याय मिळे पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. व तुम्हाला ही स्वस्थ बसू देणार नाही. ज्या,ज्या ठिकाणी आंदोलन पुकारले जाईल त्या ठीकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन कांबळे यांनी उपस्थित समुदायाला केले .
आंदोलन यशस्वी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पदाधिकार विलास डोंगरे, राजेश अहीव, सुमन बावने, प्रवीण डोंगरे , गणेश मुंगले, अमोल खंडार, अशोक डोंगरे, सुधाकर वाघमारे, अशोक डोंगरे ,गजुभाऊ मुगंले, संग्राम कळणे, उत्तम चव्हाण, संगिता वानखेडे, गंगा चव्हाण, रूखमा तेलंगे, ज्योती पोटफोडे, प्रफूल कांबळे , विनोद शिखरे, अजय डोंगरे, मनोहर डोंगरे, नरेश डोंगरे, शंकरराव वानखेडे, पुंडलिक पवार, गुलाबराव कळणे, प्रफूल कांबळे, संदेश आमटे, विनोद आमटे, रवि खंदारे, शामराव इंगोले , चेतना कांबळे, आशिष अवचार, दिलीप पोटफोडे, प्रभाकर खंडारे, गोपाल कावळे, सतिश गवळी, नितेश कांबळे, आकाश बावणे, रमेश पवार, सुशांत खडसे, देवानंद बेंन्डे, भिमराव हिवराळे आदींनी प्रयत्न केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा