Uddhav Thackeray: राज्यपालांच्या फुलटॉस वर मुख्यमंत्र्यांचा सिक्सर ; अभिनेत्रीलाही लगावला टोला

केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?

CM's six on governor's fulcrum;  The actress was also attacked



मुंबई: राज्यातील मंदिरे उघडण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र १२ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून, राज्यातील मंदिरे का उघडली जात नाहीत आपण हिंदुत्व सोडून सेक्युलर झालात का ? असा खोचक प्रश्न उपस्थित केला. आज या पत्राला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत राज्यपालांना उत्तर देण्यासाठी पत्र पाठवले. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची नाही,असे त्यांनी यात म्हंटले आहे.


महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपने राज्यात आंदोलन सुरु केले आहे. याच, पार्श्वभूमीवर राज्यपालांनीही मंदिरांबाबत मुख्यमंत्री यांना पत्र पाठविले. या पत्राला, मुख्यमंत्र्यांनी यांनी ठाकरे शैलीत उत्तर दिले. 'माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.' तसंच, 'माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हेही माझ्या हिंदुत्वात बसत नाही,' असा अभिनेत्री कंगना राणोतला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेले पत्र:


माननीय राज्यपाल महोदय , महाराष्ट्र राज्य यांसी –


जय महाराष्ट्र ,


महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी आणि उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल. महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही . Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो. जय हिंद , जय महाराष्ट्र .


आपला नम्र


– उद्धव ठाकरे.

टिप्पण्या