- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ट्रक मालकाकडून किंवा ट्रक चालकाकडून वराईची रक्कम घेतल्यास त्यांचेवर होणार F. I.R दाखल
अकोला : ट्रक मालकाकडून किंवा ट्रक चालकाकडून वराईची रक्कम घेतल्यास त्यांचे विरोधात पोलिसात तक्रार (F.I.R.) दाखल करण्यात येणार असून, याची सुरुवात अकोला जिल्ह्यात येत्या १ नोव्हेंबर पासून होत असून, व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती जिल्हा मोटर मालक, मालवाहतुक असोसिएशन अमरावती अंतर्गत शाखा अकोला जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे
अमरावती जिल्हा मोटर मालक, मालवाहतुक असोसिएशन अमरावती अंतर्गत शाखा अकोला जिल्हाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता मोटर मालक वाहतुक असोसिएशन जिल्हा अकोला व्दारा अकोला जिल्हात 'जिसका माल उसका हमाल' ही संकल्पना १ नोव्हेंबर पासून अकोला जिल्ह्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे ०२ ऑक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या पत्रानूसार माथाडी कामगार मंत्रालय मुंबई यांचे सप्टेंबर २०१६ रोजीचे शासन परिपत्र प्रमाणे अवैध वराई च्या नावाखाली व्यापारी किंवा हमाल यांनी ट्रक मालकाकडून किंवा ट्रक चालकाकडून वराईची रक्कम घेतल्यास त्यांचेवर F . I.R दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमरावती, सोलापुर,कोल्हापूर, कोपरगांव, अहमदनगरच्या धर्तीवर अकोला जिल्ह्यात १ नोव्हेंबर पासून 'जिसका माल उसका हमाल' ही मोहीम राबविण्यात येईल.
अकोला जिल्हयातील सर्व प्रकारचे व्यापाऱ्यांना अकोला मोटर मालक माल वाहतुक असोसिएशनने आवाहन केले आहे की, येत्या १ नोव्हेंबर पासुन कुठल्याही प्रकारचा माल लोडीग, अनलोडींग करतांना हमालची वराई व्यापारी यांनी स्वतः द्यावी,
मोटर मालक व चालक यांनी अकोला जिल्हयात १ नोव्हेंबर पासून कोणत्याही हमालाला कोणत्याही प्रकारची वराई हमाली देणार नाही याची खबरदारी यावी, असे आवाहन अमरावती जिल्हा मोटर मालक, मालवाहतुक असोसिएशन अमरावती अंतर्गत शाखा अकोला जिल्हा अध्यक्ष याकूब खान,उपाध्यक्ष अय्युब खान,उपाध्यक्ष जावेद खान पठाण, सचिव शेख अस्लम शे नाजीम,सचिव अमीन पटेल आदींनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा