TRP scam:एकाच वेळी चार नावे धारण करून व्यवहार करणारा पोलिसांना आला शरण ;आणखी बडे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता

अमित उर्फ अजित उर्फ महाडिक उर्फ अभिजित कोलवडे अशी अनेक नावे धारण करून वावरत असलेला आरोपी रविवारी पोलिसां समोर शरण आला.

                       (प्रातिनिधिक छायाचित्र)




मुंबई: टीआरपी घोटाळ्यामध्ये मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली आहे. त्यामुळे आता संशयित आरोपी स्वतःहून पोलिसांच्या शरण येवून राहिले. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपी एकच व्यक्ती असून, तो चार नावे धारण करून व्यवहार करीत असल्याचे उघडकीस आले.




अमित उर्फ अजित उर्फ महाडिक उर्फ अभिजित कोलवडे अशी अनेक नावे धारण करून वावरत असलेला आरोपी रविवारी पोलिसां समोर शरण आला. या आरोपीला अटक झाली असून,आता या घोटाळ्यातील आरोपींची संख्या दहा वर पोहचली आहे.


याप्रकरणात नऊ आरोपींना अटक झाली होती. या आरोपींची चौकशी सुरू असताना अभिजितचे नाव समोर आले. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत.त्यामुळे पोलीस  आपल्यापर्यंत कधीही पोहचू शकतात, या भीतीने अभिजितने  आपल्या वकिलांच्या सल्ल्याने पोलिसांना शरण आला. आता पोलिसांनी अभिजीतला अटक केली आहे. अभिजीतच्या अटकेमुळे आणखी काही धागेदोरे हाती लागून, बोगस टीआरपी दर्शवणारे बडे मासे पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे



पैसे वाटप करून टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात आतापर्यंत फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महामूव्ही, न्यूज नेशन आणि रिपब्लिक टीव्ही या पाच वाहिन्यांची नावे समोर आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. टीआरपी वाढविण्यासाठी पैसे घेणाऱ्या वाहिन्यांच्या साथीदारांनी आर्थिक देवाण-घेवाणाकरिता बोगस कंपन्या थाटून राजरोस व्यवहार करीत होते,असे सुध्दा पोलीस तपासात समोर आले. 

टिप्पण्या