Temple closed: देऊळ बंद: आघाडी सरकार विरोधात श्रीराम भक्तांचे अन्नत्याग आंदोलन

देशभरात सर्व धार्मिक स्थळे सुरु असतांना  केवळ आकस बुद्धीने व सर्वत्र व्यवहार सुरु असतांना अनलोक ५ मध्ये धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी सरकारचा उद्देश काय, असा सवाल आ गोवर्धन शर्मा यांनी उपस्थित केला.

 Temple closed: Shriram devotees go on hunger strike against alliance government (file photo )



अकोला :शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिघाडी सरकारच्या राज्यामध्ये ईश्वराच्या भक्तीला बंदी तर दारू, बार, सुरु  याच्या निषेधार्थ श्रीराम नवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभो मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्या आवाहनानुसार पश्चिम विदर्भातील ४५० देवस्थानाचे पदाधिकारी यांचे सह १५६२४ भक्तांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य घरोघरी १ दिवसीय अन्न त्याग आंदोलन करण्यात आले.



हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वंशजाकडून भक्तांना भक्तीमध्ये तल्लीन होण्यापासून मनाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व भक्तांनी जात, पात, धर्म, पंथ विसरून एकतेचे प्रदर्शन घडवल्याबद्दल श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने सर्वासेवाधिकारी आ गोवर्धन शर्मा यांनी आभार व्यक्त केले,. सरकारला सद् बुद्धी देओ अशी प्रार्थना केली.



देशभरात सर्व धार्मिक स्थळे सुरु असतांना  केवळ आकस बुद्धीने व सर्वत्र व्यवहार सुरु असतांना अनलोक ५ मध्ये धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी सरकारचा उद्देश काय, असा सवाल आ गोवर्धन शर्मा यांनी उपस्थित केला.


धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे धार्मिक संस्थाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मंदिर परिसरात व्यवसाय करणारे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनशांती साठी आराधना करणाऱ्या तसेच मंदिराच्या भरवशावर उपजीविका करणाऱ्या वर्गावर आर्थिक संकट उपस्थित राहून, त्यांची मानसिक अवस्था गेल्या ७ महिन्यात बिघडली आहे. केवळ आम्ही सर्वांपेक्षा वेगळे आहोत व धर्मनिरपेक्षवादी असल्याचा आव आणण्यासाठी सत्ताधारी पक्ष प्रयत्न करीत असून, यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. शासन याबद्दल संवेदनशील नाही. यासाठी राष्ट्रीय पक्षांनी तसेच वारकरी संप्रदायांनी आंदोलन केल्यावर सुद्धा या कुंभकर्णी सरकारची झोप उडाली नाही. श्रीराम नवमी शोभायात्रा समितीने लोकशाहीतील महत्वाचा हत्यार तसेच प्रभू ईश्वराला आराधना करण्याच्या दृष्टीने या सरकारला सद् बुद्धी देओ अशी प्रार्थना व भक्तांना भक्ती मार्ग व आराधना व दर्शनापासुन वंचित ठेवणाऱ्या सरकारला प्रतिकूल परीस्थीती निर्माण करून मंदिर व धार्मिक स्थळे सुरु करण्यास भाग पाडावे यासाठी श्रीराम नवमी शोभा यात्रा समितीने आ. गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनात अन्न त्याग आंदोलन केले.


समितीचे अध्यक्ष विलास अनासाने, अशोक गुप्ता, ब्रिजमोहन चितलांगे, डॉ अभय जैन, डॉ संजय सोनावणे, वसंत बाछुका, गिरीराज तिवारी, अनिल मानधने, गिरीश जोशी, अनिल थानवी, संदीप वाणी, बाळकृष्ण बिडवाई, सागर शेगोकार, सतीश ढगे, ओमप्रकाश गोयंका, सतीश गोयंका, नवीन गुप्ता, मोहन गुप्ता,पुष्पा वानखडे, रेखा नालट, मनीषा भुसारी, ज्योती कोल्हटकर, कल्पना अद्चुले, पद्मा अद्चुले, मनीष सावजी, संतोष शर्मा, सोनाल अग्रवाल, सुमनदेवी अग्रवाल, विनायक शांडिल्य गुरुजी, विकी अग्रवाल, अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ टाले, विजय जयपिल्ले, हरीश आलमचांदणी, नवीन झुनझुनवाला, मोहन गुप्ता, सागर तिवारी, मालती रणपिसे, सोनाल शर्मा, ज्योती शर्मा, सुरेखा अग्रवाल आदीसह भक्ताच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एकदिवसीय अन्न त्याग करून पश्चिम विदर्भात अनेक सामाजिक संस्था, धार्मिक संस्था व भक्त सहभागी होऊन या अभिनव आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.





टिप्पण्या