Teacher award:अलिफिया आलमदार यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

युनेस्को संघटने द्वारे १९९४ पासून जागतिक शिक्षक दिन ५ आक्टोबर रोजी आयोजित करण्यात येतो. 

International Teacher Award to Alifia Alamdar



अकोला: युनेस्कोच्या सिडनी येथील इको ट्रेनिंग सेंटर तर्फे जगभरातील निवडक उपक्रमशिल तथा तंत्रस्नेही शिक्षकांना देण्यात येणारा मानाचा आंतरराष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रभात किड्स स्कूलच्या शिक्षिका अलिफिया आलमदार यांना नुकताच ऑनलाइन रितीने प्रदान करण्यात आला. कोविड-१९च्या संसर्ग कालावधीत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.


युनेस्को संघटने द्वारे १९९४ पासून जागतिक शिक्षक दिन ५ आक्टोबर रोजी आयोजित करण्यात येतो. या विशेष दिवसाचे औचित्य साधून कोविड-१९च्या संसर्ग कालावधीत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध देशातील तंत्रस्नेही, उपक्रमशील शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध देशांतील निवडक शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रभातच्या अलिफिया आलमदार यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


 अत्यंत उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय असलेल्या आलमदार यांनी गतवर्षी प्रभात येथे घेण्यात आलेल्या वैदर्भिय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या समन्वयकाची भूमिकादेखील बजावली आहे.


प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे,संचालिका वंदना नारे व सचिव निरज आंवडेकर यांनी अलिफिया आलमदार यांचे हार्दिक अभिनंदन केले असून तज्ज्ञ संचालक कांचन पटोकार, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी व शिक्षकवृदांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


भारतातून सहा तज्ज्ञ शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 या पुरस्कारासाठी भारतातून सहा शिक्षकांची निवड झाली असून प्रभातच्या अलिफिया आलमदार यांच्यासह पुणे, सोलापूर, अहमदनगर, पंजाब आणि दिल्ली येथील अन्य पाच शिक्षकांना गौरविण्यात आले आहे.

टिप्पण्या