वडील गवंडी काम तर आई माेलमजुरी करते घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतांना परिस्थिती वर मात करुन स्नेहलने यश संपादन केले
विझाेरा: घरामध्ये अठरा विश्व दारीद्रय वडील गवंडी काम तर आई माेलमजुरी करते अशा प्रतिकुल परिस्थितीतही ग्रामीण भागातील विझाेरा येथील स्नेहल लाटे या मुलीने नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शिक्षण सभापती चंन्दशेखर पांडे गुरुजी यांनी विझाेरा गाठुन स्नेहलचे काैतुक केले.
राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) 2020 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे त्या मध्ये विझाेरा येथील अत्यंत गरीब कुंटुबातील स्नेहल पंडीत लाटे अनुसुचित जाती प्रवार्गातुन देशातुन 217 वी आली आहे.
तिचे वडील गवंडी काम तर आई माेलमजुरी करते घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतांना परिस्थिती वर मात करुन स्नेहलने यश संपादन केले. ते ही एका खेड्यातील मुलीने हे समजताच, अकाेला जि.प. चे शिक्षण सभापती पांडे गुरुजी पंं. समिती सदस्य दादाराव पवार यांनी थेट विझाेरा गाठुन स्नेहलचे भरभरुन काैतुक करुन तिचा शाल व पुष्प देउन गुण गाैरव केला.
स्नेहलच्या घरची परिस्थिती जेमतेम असतांना सुध्दा तिने हे यश साध्य केले, असे विद्यार्थी फार कमी घडतात. परंतू याची प्रेरणा इतरही विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे पांडे गुरुजी यांनी सांगुन स्नेहलला जेव्हा जेव्हा मदत लागेल, तेव्हा पुर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी केंन्द प्रमुख गाेकुळ अभाेरे, शिक्षक अविनाश तेलगाेटे, सरपंच आर.बी.गवई, ग्रा पं. सदस्य उमेश गवई, सुखदेव इंगळे, बंडु शिंदे, रमेश गवई, प्रा नितीन गवई, माजी सरपंच सुरेश जाधव, धम्मा राउत, माेहन राऊत, सुखदेव राउत, संताेष इंगळे उपस्थित हाेते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.नितिन गवई यांनी केले.
स्नेहलला पंचवीस हजाराची मदत
स्नेहल लाटे हिच्या घरची परिस्थिती पाहता तिला पुढील शिक्षणा करिता आर्थिक मदत म्हणुन केंद्रप्रमुख गाेकुळ अंभाेरे, महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य रमेश चव्हाण, सुधाकर वाहुरवाघ, प्रा. सत्यनिवास इंगळे, कांबळे सर यांचे कडुन प्रत्येकी पाच हजार रुपयाची अशी एकंदरीत पंचवीस हजाराची मदत नगदी स्वरुपात देण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा