Sholegiri: गोरव्हा येथे महिलेची 'शोलेगिरी'... ८० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढून केला आत्महत्येचा प्रयत्न

अंदाजे ८० फुट उंच पाण्याच्या टाकीवर चढलेल्या महीलेला रेस्क्यु ऑपरेशन करुन सायंकाळी सहा वाजता सुखरुप वाचविले. गोरव्हा (बार्शीटाकळी) जिल्हा अकोला येथील घटना.

'Sholegiri' of a woman from Gorva ...Attempted suicide by climbing 80 feet high water tank

 


भारतीय अलंकार

अकोला: अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र अभिनित शोले या चित्रपटातील एक गाजलेलं दृश्य.ज्यामध्ये धर्मेंद्र पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करतो, असाच काहीसा प्रसंग आज अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा या गावी घडला.


जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी चित्तथरारक रेस्क्यु ऑपरेशन करतांना गावकरी श्वास रोकुन पाहत होते. रोपक्लायबिंग करतांना सोबतच वायर रोप च्या साहाय्याने कव्हरिंग देत दीपक सदाफळे यांनी त्या महीलेला सुखरुप खाली आणले.



सविस्तर घटना अशी की, गोरव्हा ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला येथील गावातील ग्रामपंचायत जवळ असलेल्या अंदाजे ८० फुट ऊंच पाण्याच्या टाकीवर आज सकाळी मुंबईहून आलेल्या अंदाजे २७ वर्षीय महीला ही आज दुपारी १:३० वाजताच्या सुमारास अचानक आत्महत्या करण्याच्या हेतूने टाकीवर चढली. तेव्हा गावातील सर्व लोकांनी हायच खाल्ली. गावकऱ्यांनी सर्व प्रयत्न पणाला लावले. मात्र, ही महीला काही केल्या खाली उतरेना. दुपार पासुन गावकरी तथा पोलीसांनी तिला खाली उतरविण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले. परंतू सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.



अखेर बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तीरुपती राणे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करण्यासाठी पाचारण केले. लगेच क्षणाचाही विलंब न करता जिवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी ऋषीकेश तायडे, मयुर कळसकार रेस्क्यु साहीत्य घेऊन ३० मिनीटात घटनास्थळी पोहचले.


यावेळी लगेच दीपक सदाफळे यांनी बाॅडी हाॅर्नेक्स दोन आणि कॅराबिनर डबल फुली वायर रोप व झुमर घेऊन टाकीवर चढले. त्या महीलेला समुपदेशन करुन मोठ्या शिताफीने विश्वासात घेतले. त्यानंतर महीलेला लगेच बाॅडी हाॅर्नेक्स घालण्यास लावून वायर रोपच्या साहाय्याने पॅकअप केले. 



यावेळी पोलीस कर्मचारी आणि गावातील काही तरुण तीला समजुत घालण्यासाठी वर थांबलेले असतांना ती काही केल्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. कधीही उडी मारून आत्महत्या करेल काही नेम नव्हता. परंतू, जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी मोठया शिताफीने कसोशीने प्रयत्न करुन शेवटी सायंकाळी सहा वाजता त्या महिलेला सुखरुप खाली काढले.महिला खाली आल्याचे पाहून सर्व गावकऱ्यांचा जीव भांडयात पडला.



महिलेला पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्या महीला सुखरुप आहे. मात्र,आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप तिने सांगितले नाही. परंतू, मानसिक तणावातून तिने  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा कयास उपस्थित गावकरी आणि पोलिसांनी लावला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असून,तपासा अंती कारण स्पष्ट होईलच.


यावेळी बार्शिटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तीरुपती राणे, एपीआय.शाम तायडे , हे.काॅ.संजय भगत, पो.काॅ.अमोल पवार, हो.गा.महादेव नेमाडे  हजर होते. यावेळी सरपंच राजेश खांबलकर, पो.पा.सुनिता खांबलकर, ग्रा. पं.स. संदीप राठोड, सुरेश डोंगरे आणि गावकरी हजर होते. यावेळी सागर डोंगरे, अभिषेक डोंगरे,अजय डोंगरे, हेड.काॅ. संजय भगत, पो.काॅ.अमोल पवार यांनी सहकार्य केले, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली.



Vidio:गोरव्हातील महिलेची 'शोलेगिरी'...घटनेची माहिती देताना दीपक सदाफळे


टिप्पण्या