Shivsena:शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी घेतला एकेकाचा समाचार!

मुंबई: भाजपाने हिम्मत असेल तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवावे, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपाला दिले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा हा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडली.

                                     (फोटो:ट्विटर)


जीएसटी करप्रणाली जर सदोष असेल तर ती रद्द करून जुन्या पद्धती प्रमाणे वसुली करून प्रत्येक राज्यांना त्यांचा वाटा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. 


काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं," असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लगावला. हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात. घंटा वाजवा, थाळ्या बडवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे.सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या. असा टोला त्यांनी राज्यपालांचे नाव न टोलविला.


मुंबईत येऊन नाव कमवायचं आणि मुंबईची बदनामी करायची हे चांगले नाही या शब्दात टीका करत उद्धव ठाकरे यांनी गांजाची शेती कुठे होते ते तुम्हाला माहिती आहे, असा टोला अप्रत्यक्षपणे अभिनेत्री कंगना हिच्यावर लगावला. बिहारच्या मुलाच्या आत्महत्येचं राजकारण करताना महाराष्ट्राच्या मुलावर आरोप करण्यात आले. 


बिहारमध्ये मोफत लस देण्याच्या भाजपच्या आश्वासनाचा देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. काही जणांना माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. राज्यातले एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात, अशी टीका ठाकरे यांनी केली. नारायण राणे यांचे नाव न घेता ठाकरे यांनी फटकेबाजी केली.



शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी आज दसऱ्याच्या शुभदिनी  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केले.





टिप्पण्या