Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘अतिरेकी हिंदुत्वाचे प्रिय प्रतीक’ म्हणत घोर अवमान;ऑनलाईन न्युज पोर्टल विरोधात तक्रार दाखल

‘द वायर’चे संपादक आणि मालक यांच्या विरोधात पोलीस तक्रार. अमरावती, विक्रोळी, रायगड येथील पो.स्टे.ला तक्रार नोंदवली.

                                       file photo




अकोला: ‘द वायर’ या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर ८ ऑक्टोबर रोजीच्या ‘By Attacking the Mughals, Adityanath Is Erasing the History of His Own Nath Samprady’ या मथळ्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि क्रिस्टीन मारेवा कारवोस्की या पत्रकार महिलेने लिहिलेल्या एका लेखात छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अवमान करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते  रमेश शिंदे यांनी केली आहे.



काय लिहिले आहे लेखात


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘मुघल म्युझियम’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ असे करण्याची घोषणा केली, यावर टीका करणार्‍या या लेखात ‘छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे हिंदु राष्ट्रवादाच्या अतिरेकी हिंदुत्वाचे सर्वात आवडते प्रतिक’ असे म्हटले आहे. हे लिखाण अत्यंत निंदनीय असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करते. अवघ्या हिंदु समाजाला दैवतासमान असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अवमान करणार्‍या ‘द वायर’ या न्यूज पोर्टलचे संपादक, मालक आणि पत्रकार यांच्यावर  गुन्हे दाखल  करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने देशभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात केलेल्या पोलीस तक्रारीतून केली आहे.



महाराष्ट्रात या ठिकाणी तक्रार दाखल


शिंदे यांनी सांगितले की, या विरोधात मुंबईत विक्रोळी येथे प्रभाकर भोसले यांनी, तर अमरावती येथे रोशन मुळे यांनी, रायगड येथे रोहिदास शेडगे यांनी पोलीस तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीमध्ये ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन, सिद्धार्थ भाटीया, एम.के. वेणु आणि लेखिका क्रिस्टीन मारेवा कारवोस्की यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३ अ, २९५ अ आणि ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करावा आणि आरोपींना त्वरीत अटक करावी, असे म्हटले आहे.



HJS ची चेतावणी



छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्याही प्रकारे केला गेलेला अवमान हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी या प्रकरणी तात्काळ माफीनामा जाहीर करावा आणि हे वृत्त मागे घ्यावे, तसेच अखिल हिंदु समाजाची जाहीर माफी प्रसिद्ध करावी, अन्यथा या प्रकरणी आपल्याला न्यायालयामध्ये खेचू, अशी चेतावनीही शिंदे यांनी या वेळी दिली.


***

An insult to Chhatrapati Shivaji Maharaj in an article published on the online news portal 'The Wire' on October 8 under the headline 'By Attacking the Mughals, Adityanath Is Erasing the History of His Own Nath Samprady'  Has been done.  Ramesh Shinde, National Spokesperson of Hindu Janajagruti Samiti, has demanded that immediate action should be taken against those involved in this case.

   






टिप्पण्या