self-immolation: तीन महिन्याचे वेतन रखडले; एस टी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आत्मक्लेश आंदोलन

कोविड - 19 च्या महामारीच्या काळात एसटी कामगार जीवाची बाजी लावून काम करीत असतांना, त्यांना मात्र तीन महिन्यांपासून (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) वेतन नाही, वेतन नसल्यानं कर्मचारी हवालदिल झाले आहेत. तर काहींनी उपासमारी होत असल्याने टोकाचे पाऊल उचलत आहे.

Three months salary stagnant;  Statewide self-immolation movement of ST employees (file photo)



भारतीय अलंकार
अकोला: एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्या पासून वेतन झाले नसल्याने कर्मचाऱ्यांना कोरोना परिस्थिती सोबतच आर्थिक संकंटासोबत दोन हात करावे लागत आहे. कोरोना महामारीच्या काळात एसटी कर्मचारी दिवसरात्र प्रवाशांच्या सेवेत आहेत. तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने उपासमारीची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. येत्या ७ ऑक्टोबर पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन न मिळाल्यास ९ ऑक्टोबर पासून संघटनांनी आक्रमक होत  राज्यव्यापी आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोविड - 19 च्या महामारीच्या काळात एसटी कामगार जीवाची बाजी लावून काम करीत असतांना, त्यांना मात्र तीन महिन्यांपासून (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) वेतन नाही, वेतन नसल्यानं कर्मचारी हवालदिल झाले आहेत. तर काहींनी उपासमारी होत असल्याने टोकाचे पाऊल उचलत आहे, असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे .७ ऑक्टोबर पर्यंत एस टी कर्मचाऱ्यांचे थकीत तीन महिन्यांचे वेतन न झाल्यास ९ ऑक्टोबरला एसटीच्या राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.



वेतन प्रदान अधिनियम १९३६ या कायद्यातील कलम ५ अन्वये प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला अथवा ७ तारखेपूर्वी वेतन देणे बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात वेळेवर वेतन न दिल्यास कलम २० अन्वये फौजदारी गुन्ह्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देण्याची कायदेशीर जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. ७ ऑक्टोबर पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यास इंटकच्या वतीने उच्च न्यायालयात एसटी महामंडळाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे इंटक संघटनेने जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे. 




महाराष्ट्र एस टी कामगार संघटना अकोला विभाग


तीन महिन्याचे थकीत वेतन एक रकमी झालेच पाहिजे - कामगार संघटना


आज घडीला प्रत्येक एस टी कामगाराला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतू, भांडल्या शिवाय काहीच मिळणार नाही, आणि रास्त मागणीसाठी लढणे काही चुकीचे नाही. प्रत्येक कामगार कर्जात बुडालेला आहे. म्हणून ही लढाई आपल्या कुटुंबाच्या अस्तित्वासाठी आपल्याला लढावीच लागणार आहे. तरच आपले कुटुंब जगू शकणार आहे. यासाठी ९ ऑक्टोबरच्या आत्मक्लेश उपोषणात जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे, असे आवाहन अकोला विभागीय अध्यक्ष  कैलास नांदुरकर, विभागीय सचिव रूपम वाघमारे तसेच महिला आघाडी प्रमुख सविता नागवंशी यांनी केले आहे


टिप्पण्या