- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गेल्या तीन दशकां पासून सनातन संस्था जिज्ञासू आणि साधक यांचे अध्यात्म आणि साधना यांच्या संदर्भातील शंकांचे निरसन करून त्यांना ईश्वरप्राप्तासाठी मार्गदर्शन करत आहे.
अकोला: सध्या कोरोना महामारी मुळे सर्वच लोकांना सत्संग आणि प्रवचन यांसाठी प्रत्यक्ष बाहेर जाणे शक्य होत नाही. अशा वेळी घरी राहून लोकांना साधने विषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी सनातन संस्थेने ‘आनंदी जीवन आणि आपत्काळ यांच्या दृष्टीने अध्यात्माचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन साधना प्रवचन शृंखला’आयोजित केली आहे.
हे ऑनलाईन प्रवचन ११ ऑक्टोबर, १८ ऑक्टोबर आणि २४ ऑक्टोबर यादिवशी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगु, मल्याळम्, तमिळ आणि बंगाली या ९ भाषेत होणार आहे.
धर्मशास्त्रात ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत; पण या हजारो साधना मार्गांपैकी नेमक्या कोणत्या साधनेला आज प्रारंभ करावा ?, दैनंदिन धकाधकीचे जीवन आणि सध्याच्या कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात अध्यात्माचे महत्त्व काय ?, पितृदोष म्हणजे काय आणि त्याचे निवारण करण्यासाठी कोणती साधना करावी ?, जीवन आनंदी बनवण्यासाठी कोणती साधना करावी ? अशा विषयांवर या प्रवचनामध्ये अमूल्य मार्गदर्शन केले जाणार आहे.
साधनेमुळे आत्मबल वाढते आणि त्यामुळे प्रतिकूल वातावरणातही आनंदी जीवन जगता येते. यासाठी ही साधना प्रवचन शृंखला आहे. प्रस्तूत प्रवचन मालिका सनातन संस्थेच्या यू-ट्यूबच्या लिंक वरून प्रक्षेपित होणार आहेत. त्याचा जिज्ञासूंनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सनातन संस्थेच्या कार्यालयाशी अथवा पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती अकोला सनातन संस्थेच्या मेघा जोशी, विजय खोत यांनी दिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा