- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पुण्यातील शिवाजीनगर मुख्यालयातील कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवायला गेलेल्या कर्मचाऱ्याच्या गोळी लागली आणि त्यात तो जखमी झाला.
पुणे: शिवाजी नगर पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला गोळी लागली, ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महिला पोलीस सहकारी सोबत झालेल्या वादातून ही घटना घडली असल्याची चर्चा आहे.
जखमी पोलीस कर्मचारी बेंडाळे आणि पोलिस शिपाई सस्ते हे शिवाजीनगर मुख्यालयात कार्यरत आहेत. क्वार्टर गेट येथे बेंबळे, सस्ते आणि एक महिला कर्मचारी रात्रपाळीला कर्तव्यावर होते. दरम्यान सस्ते व महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला. वादात सस्ते यांनी ताणावा खाली येऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सस्ते यांना वाचविण्यासाठी बेंडाळे यांनी त्यांना रोखले. यावेळी झालेल्या झटापटीत रायफलीतून चुकून गोळी सुटली आणि बेंडाळे यांना लागली. यात बेंडाळे जखमी झाले असून,त्यांना ससून रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे,अशी प्राथमिक माहिती विश्वसनीय सूत्रांनी सांगितली.
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांवर कामाचा अतिरिक्त बोजा आणि मानसिक ताण यामधून ही घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा