prakash aambedkar: नरेंद्र मोदी दारुड्या सारखे वागत आहेत-प्रकाश आंबेडकर यांनी ऑनलाईन सभेत केले वक्तव्य

भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा अकोल्याच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव-२०२० मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑनलाईन सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.


अकोला:एखादा दारुडा आपल्या आई-वडील आणि बायकोने पैसे दिले नाहीतर; घरातील वस्तू विकून त्या पैशात दारू विकत घेवून पितो,अशीच दारुड्या गत अवस्था नरेंद्र मोदी यांची झाली आहे.हे शासन कंगाल शासन आहे. केंद्रातील   सरकार देशाची संपत्ती विकायला निघाले आहेत,असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले..



पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांना प्रकाश आंबेडकरांनी सोलापूरातील आपत्तीजनक वक्तव्याचा आजच्या सभेतही पुनूरूच्चार केला. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींची तूलना बायकोला मारणाऱ्या दारूड्या नवऱ्याशी केली. 


भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा अकोल्याच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव-२०२० मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑनलाईन सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत माणसाला किंमत नाही. आरएसएस भाजपच्या शासनात माणूस आणि माणुसकीला किंमत नाही,असे आंबेडकर भाषणाच्या सुरवातीला म्हणाले. 


लॉकडॉऊन' काळात मोदींनी स्थलांतर करणाऱ्या मजुरांसाठी कम्युनिटी किचनची संकल्पना का राबविली नाहीय?, असा प्रश्न देखील आंबेडकर यांनी उपस्थित केला.


कृषी विधेयकात संशोधन करणार पंजाब आणि कृषि विधेयक नाकारणारी राज्य सरकार 56 इंचांची छाती असल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी बरखास्त करणार का?,सवाल असा प्रकाश आंबेडकरांचा यांनी उपस्थित केला.



सौदी, मलेशिया, इराकसह मुस्लिम राष्ट्रांसोबतचा संघर्ष वाढल्याने आपल्याला इंधन आणि पेट्रोलियम क्षेत्रात किंमत मोजावी लागते.तर चायना सोबत युद्ध झाले तर आपण युद्धात किती दिवस टिकणार याचा विचार करणार  आहे का,असे आंबेडकर म्हणाले.


सभेला भंते बी संघपालजी, भन्ते बुध्दपाल, पि जे वानखडे (जिल्हाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा) अंजलीताई आंबेडकर,राजेंद्र पातोडे(प्रदेश प्रवक्ते), धैर्यवर्धन पुंडकर (प्रदेश प्रवक्ते), अरुंधती शिरसाट (महिला प्रदेश महासचिव), प्रमोद देंडवे (जिल्हाध्यक्ष वंचित) ,प्रदीप वानखडे (जिल्हाध्यक्ष भारिप), प्रभा शिरसाट (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी),प्रतिभा भोजने(जि प अध्यक्ष), सावित्री राठोड(जि प उपाध्यक्ष),चंद्रशेखर पांडे (सभापती), आकाश शिरसाट (सभापती), मनिषा बोर्डे (सभापती), पंजाबराव वडाळ, साहील आनंदराज आंबेडकर उपस्थित होते. 


वंदना याचना भाऊसाहेब थोरात,प्रस्ताविक विजय जाधव, संचालन- एम आर इंगळे  यांनी केले. आभार  रमेश गवई यांनी मानले.

टिप्पण्या