Prakash Aambedkar: माथाडी कामगारांसारखा ऊसतोड कामगार बोर्ड तयार झाला पाहिजे- प्रकाश आंबेडकर

या लढ्याला यशस्वी करण्यासाठी जे योगदान देता येईल ते द्या.करारनामा झाल्याशिवाय एकही कामगार गाडीत बसणार नाही, याची काळजी घ्या

                             f i l e photo


कारखाना सुरू करणे ही कारखानदारांची गरज आहे. ऊसतोड मजूरांनी नव्या करारनाम्यासाठी माथाडी कामगारां सारखा लढा द्यावा. माथाडी कामगारांसारखा ऊसतोड कामगार बोर्ड तयार झाला पाहिजे, अशी भूमिका ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. 



रविवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये, बीड येथील भगवान गडाच्या पायथ्याशी  ऊसतोड कामगार,मुकादम,आणि वाहतूकदार यांचा दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ऊसतोड कामगारांना संबोधित करताना ऍड आंबेडकर बोलत होते.





या लढ्याला यशस्वी करण्यासाठी जे योगदान देता येईल ते द्या.करारनामा झाल्याशिवाय एकही कामगार गाडीत बसणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसाठी, वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरली आहे.  








टिप्पण्या