PPE kit: मनपा आरोग्य विभागाची हलगर्जी पिपीई किट स्मशान भुमीत दोन दिवस तशाच पडून

शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार, नगरसेवक अनिल मुरुमकार यांनी पडून असलेली पिपीई किट स्वतः जाळून टाकून जोपासली सामाजिक बांधिलकी.



अकोला: अकोला महापालिका प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या शिवर येथील युवा सेनेचे माजी उप तालुकाप्रमुख प्रशांत येवले यांचा कोरोना आजारांने २० ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम अकोला महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली शिवर येथील स्मशानभूमीत पार पडला. मात्र, यावेळी वापरण्यात आलेल्या पिपीई किट दोन दिवसांपासून स्मशानभूमीत तशाच पडून होत्या. 



याच स्मशानभूमीत शिवसेना उप जिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार यांचे मोठे वडील व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद मुरुमकार यांचे वडील प्रल्हादराव मुरुमकार यांचा सावडण्याचा कार्यक्रम २२ ला होता. पिपीई किट स्मशानभूमीत तशाच पडल्या असल्याची बाब शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार यांच्या लक्षात आली.


त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता नगरसेवक अनिल मुरुमकार, शिवरचे माजी सरपंच कपिल मुरुमकार, देवानंद मुरुमकार आदींनी सामाजिक बांधिलकी जोपासत सर्दहु किट जाळुन टाकुन संपूर्ण परीसरात सॅनिटाईझरची फवारणी केली व नंतर सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. 



शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार, नगरसेवक अनिल मुरुमकार यांनी दाखविलेल्या सर्तकतेमुळे या परीसरातील मोठा अनर्थ टळला. या कामात दिरंगाई करणा-या संबंधित कर्मचाऱ्यांवर मनपा प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या