Patur: आता पातुरच्या स्मशानभूमीत पाणी पुरवठा...

अभ्युदय फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश; शिर्ला ग्रामपंचायतचा पुढाकार 

Abhuday Foundation has taken the initiative to provide services to the citizens at Vaikunthadham in Patur.  The organization has been providing maintenance repairs and services for the past three years.





पातूर : पातूर येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना पाणी मिळावे यासाठी पातुरच्या अभ्युदय फाउंडेशनने सतत पाठपुरावा केला.  याला शिर्ला ग्रामपंचायत ने सकारात्मक प्रतिसाद देत या ठिकाणी पाणी पुरवठ्याची सोय करून दिली. 

 

पातुरच्या वैकुंठधाम येथे नागरिकांना सेवा देण्याच्या दृष्टीने अभ्युदय फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे.  ही संस्था गत तीन वर्षांपासून देखभाल दुरुस्ती आणि सेवा देण्याचे काम करीत आहे.  विविध सोई निर्माण कार्य या ठिकाणी सुरु आहेत.  याचाच एक भाग म्हणून येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याची पुरेशी सोय उपलब्ध नव्हती.  याबाबत अभ्युदय फाऊंडेशन या संस्थेने सतत पाठपुरावा करीत पाणी पुरवठ्याची मागणी केली.  याला शिर्ला ग्रामपंचायतने सकारात्मक प्रतिसाद दिला.  आणि जीवन प्राधिकरण मार्फत याठिकाणी पाणी पुरवठ्याची व्यवस्था मार्गी लावली. 


आज नळ जोडणीचे काम स्मशानभूमीत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय सिरसाट, अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, दिलीप निमकंडे, प्रविण निलखन, प्रशांत बंड,  शिर्ला ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अक्षय गाडगे,  प्रमोद उगले, अंबादास इंगळे, सागर रामेकर,  शुभम पोहरे,  हनुमंत कुंडेवार आदी उपस्थित होते. 


या पाणी पुरवठ्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी राहुल उंद्रे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी अभ्युदय फाऊंडेशन तर्फे शिर्ला ग्रामपंचायतचे आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पण्या