Parimal kasturi: 'कस्तुरी'चा परिमळ समाज सेवेच्या रूपात सतत दरवळत राहणार- विजय घाटे

कस्तुरीची  वार्षिक  सर्वसाधारण  सभा  संपन्न
Parimal of 'Kasturi' will continue to flow as a social service - Vijay Ghate



अकोला: शहरातील अग्रणी सेवाभावी संस्था कस्तुरीने समाजातील वंचित व निराधारां करिता राबविलेले उपक्रम प्रेरणादायी असून कस्तुरीचा  सेवारुपी परिमळ अविरत दरवळत राहणार, असा आशावाद संस्थेचे आजीवन सभासद व सहाय्यक मंडल प्रबंधक (LIC), अमरावती यांनी व्यक्त केला. ते कस्तुरी च्या आमसभेत प्रमुख अतिथी या भूमिकेत बोलत होते.




याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले, उपाध्यक्ष यशवंत देशपांडे, माजी आमदार वसंतराव खोटरे, डॉक्टर शांताराम बुटे, डॉक्टर जी. ए. गोसावी, सोमेश्वर पेटकर, सानेगुरुजी ज्येष्ठ नागरी संघांचे नागोराव मोहोड, वंदना कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी श्रींच्या मूर्तीचे पूजन व हारार्पण मान्यवरांनी केल्यावर, त्यांचा शाल, श्रीफळ व  स्मरणिका देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. सभेचे प्रास्ताविक यशवंत देशपांडे तर  सभेचे कामकाज संजय ठाकरे यांनी पाहिले. 


याप्रसंगी विकास किरण योजना शिर्षवृत्ती च्या मानकरी भारती सांगळे, वैष्णवी बुटे व प्रतीक्षा पांडे यांना प्रत्येकी रु. ५००० चे धनादेश मान्यवरांचे हस्ते वितरित करण्यात आले. 


सभेत कस्तुरीने कोरोना विषाणू लॉक डाऊन कालावधीत राबविलेल्या सेवाभावी उपक्रमात आर्थिक योगदान व उपक्रम यशस्वी होण्यासाठी  सहभाग दिलेल्या उज्वला बाजपेयी, कीर्ती गहिलोत, ज्ञानेश्वर पारसकर, परशुराम पारसकर, जगन्नाथ बर्डे, धीरज चांडक, महेश राठी, संजय गायकवाड , राजेश्वर पेटकर व दामोदर नुपे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. 

ज्युबिली इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अनिता कुळकर्णी यांचा सेवानिवृत्ती प्रित्यर्थ आणि  सोमेश विजय चौबे यांनी कस्तुरीची वेबसाइट डीझाइन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संस्था अध्यक्ष किशोर बुटोले यांनी अध्यक्षीय भाषणातून कस्तुरी च्या मागील दशकात झालेल्या सेवाकार्याचा आढावा घेऊन पुढील वाटचालीकरिता संकल्प जाहीर केले.  


सभेचे संचालन संजय गायकवाड तर आभार मेघा कनकेकर यांनी मानले. सभेदरम्यान कोरोना संदर्भात शासकीय नियम, सोशल डिस्टन्स, sanitizer व  मास्क इ. चे  पालन करण्यात आले. सभेच्या यशस्वीतेसाठी रवींद्र मते, अनिल पालवे. प्रशांत माकोडे हिम्मतराव निखाडे, प्रांजल पुरोहीत, संजय बुटोले, शारदा चौबे, मीरा देशपांडे, चेतन आनंदानी, दीपक वाघमारे, पंडित पळसपगार, महादेव टाले, साहेबराव हिंगणे, व्यंकटेश देशपांडे व  दामोदर नुपे यांनी परिश्रम घेतले. 

टिप्पण्या